पिंपरी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होत असून, त्या दिवशी राज्य सरकारने औद्योगिक क्षेत्रासाठी सुट्टी जाहीर केली आहे. या सुट्टीचा उपयोग प्रथम मतदानासाठी करून लोकशाही अधिक बळकट करावी, असे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी (PCMC Election 2026) केले.
लोकशाही बळकट करण्यासाठ प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वीप (SVEEP) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मतदान जनजागृती उपक्रमांतर्गत आज पिंपरी येथील टाटा मोटर्स कंपनीत भव्य मतदान शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्या बोलत(PCMC Election 2026) होत्या.
भारतरत्न जे. आर. डी. टाटा व रतन टाटा यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी टाटा मोटर्समधील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तीन हजारांहून अधिक कामगार बंधू-भगिनींनी मतदानाची शपथ घेत लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे मतदान करून १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात (PCMC Election 2026) आला.
महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह टाटा मोटर्सचे व्यवस्थापन अधिकारी आनंद लपारकर, आनंद आगाशे, डॉ. संतोष जाधव, अतुल आहिर, नितीन कदम तसेच कंपनीतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित(PCMC Election 2026) होते.
शेकडो एकर परिसरात विस्तारलेली आणि वीस हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेली टाटा मोटर्स ही औद्योगिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. अशा मोठ्या औद्योगिक संस्थेत मतदान जनजागृतीचा कार्यक्रम राबविल्यामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात (PCMC Election 2026) आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर आभार प्रदर्शन अण्णा बोदडे यांनी मानले. नागरिकांच्या मनात मतदानाबाबत सकारात्मक जाणीव निर्माण करणे आणि कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांनी (PCMC Election 2026) दिली.
फ्लॅश मॉब व पथनाट्याने जिंकली उपस्थितांची मने
मतदान जनजागृतीसाठी सादर करण्यात आलेल्या लहान मुलांच्या फ्लॅश मॉबने उपस्थितांची मने जिंकली. कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सादरीकरणाचे मनापासून कौतुक करत मुलांना भेटवस्तू देऊन प्रोत्साहन दिले. तसेच मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या पथनाट्यातून मतदान का आवश्यक आहे, याचा प्रभावी संदेश देण्यात (PCMC Election 2026) आला.
“टाटा मोटर्ससारख्या मोठ्या औद्योगिक संस्थेत घेण्यात आलेला मतदान शपथ कार्यक्रम संपूर्ण शहरासाठी लोकशाही सहभागाचा प्रेरणादायी संदेश आहे. सुदृढ, सक्षम आणि उत्तरदायी लोकशाहीसाठी मतदान करणे ही केवळ जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची लोकशाहीप्रतीची कर्तव्यभावना (PCMC Election 2026) आहे.”
— अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
