पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात तिकीट वाटपावरून तीव्र असंतोष उफाळून आला आहे. शहर भाजपच्या कार्यकारिणीतच निष्ठावंत व दीर्घकाळ पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून, ऐनवेळी पक्षात आलेल्या ‘आयात’ उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याचा गंभीर आरोप पक्षातीलच कार्यकर्त्यांकडून केला जात (Pcmc Bjp) आहे.
विशेषतः भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकीट जाहीर केल्याने जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना तीव्र झाली आहे. या निर्णयामुळे पक्षांतर्गत खदखद वाढत असून भाजप नेतृत्वावरच कार्यकर्त्यांनी बोट दाखवले(Pcmc Bjp) आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपसाठी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून देण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. आंदोलने, मोर्चे काढताना गुन्हे दाखल होण्याचा धोका पत्करत त्यांनी पक्षसंघटना मजबूत केली. मात्र, त्याच कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी देताना डावलण्यात आल्याने पक्षांतर्गत नाराजी अधिक तीव्र झाली (Pcmc Bjp)आहे.
निगडी येथील भाजप कार्यकर्ता सचिन काळभोर यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी शहरातील विविध नागरी प्रश्नांवर सातत्याने आंदोलने केली आहेत. रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित भूखंडांचे क्षेत्र कमी करण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवून निषेध करणे, निगडी ते पिंपरी मेट्रो मार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलनाचा इशारा देऊन रस्त्यांची दुरुस्ती करून घेणे, पीसीएमसी कॉलनीतील धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनासाठी पाठपुरावा करणे, अण्णा भाऊ साठे वसाहतीतील नागरिकांसाठी एसआरए प्रकल्पाची मागणी करणे, अशी अनेक आंदोलने त्यांनी यशस्वीपणे केली(Pcmc Bjp) आहेत.
याशिवाय यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांसाठी निवारा केंद्र उभारणे, यमुनानगर व भोसरी रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा सुधारण्यासाठी पाठपुरावा, आकुर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव सुरू करण्यासाठी प्रयत्न, बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाच्या दुरुस्तीबाबत सातत्याने मागणी, मेट्रो स्टेशनच्या नामकरणासाठी आंदोलन, पाणी वाया जाण्याविरोधात कारवाईची मागणी, पादचारी भुयारी मार्ग व विद्युत दाहिनी सुरू करण्यासाठी पाठपुरावा, घरकुल प्रकल्पातील आर्थिक गैरव्यवहाराविरोधात आवाज उठवणे, तसेच मालमत्ता करावरील दंड रद्द करण्यासाठी आंदोलन अशी अनेक सामाजिक व नागरी कामे त्यांनी (Pcmc Bjp) केली आहेत.
इतके व्यापक कार्य करूनही प्रभाग क्रमांक १३ मधून उमेदवारी नाकारण्यात आल्याने “भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळतो का?” असा सवाल उपस्थित होत आहे. नव्याने पक्षात आलेल्या उमेदवारांना तिकीट देऊन जुने, निष्ठावंत कार्यकर्ते केवळ आश्वासनांवर समाधान मानावेत, अशी अपेक्षा ठेवली जात असल्याची भावना शहर भाजपमध्ये पसरली (Pcmc Bjp)आहे.
या पार्श्वभूमीवर “भविष्यात भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्याय देतील का?” असा थेट प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात असून, तिकीट वाटपावरून निर्माण झालेला हा वाद भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली(Pcmc Bjp) आहेत.
