Home माझं पिंपरी चिंचवड Ajit Pawar Masterstroke:भाजपला धक्का! आझम पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे राष्ट्रवादीत दाखल

Ajit Pawar Masterstroke:भाजपला धक्का! आझम पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे राष्ट्रवादीत दाखल

पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आझम पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपसाठी मोठा राजकीय धक्का.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी–चिंचवड शहरातील राजकीय हालचाली वेगाने घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने एक महत्त्वपूर्ण आणि निर्णायक राजकीय पाऊल टाकले आहे. शहरातील प्रभावी आणि वजनदार नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या आझमभाई पानसरे यांचे पुत्र निहाल आझम पानसरे यांनी वडिलांच्या आशीर्वादाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. या घडामोडीमुळे पिंपरी–चिंचवडच्या राजकारणात खळबळ  (Ajit Pawar Masterstroke) उडाली आहे.

सध्या शहरात भाजपकडून मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशांचे प्रयत्न सुरू असतानाच निहाल पानसरे यांचा राष्ट्रवादीत झालेला प्रवेश हा भाजपसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. आझम पानसरे यांना पिंपरी–चिंचवडमध्ये आजही भक्कम जनाधार असून, विशेषतः अल्पसंख्याक समाज तसेच झोपडीपट्टी आणि वसाहत भागातील मतदारांवर पानसरे गटाचा प्रभाव निर्णायक स्वरूपाचा आहे. स्थानिक प्रश्नांवरील सखोल पकड, मजबूत संघटनात्मक रचना आणि कार्यकर्त्यांचे जाळे ही या गटाची प्रमुख(Ajit Pawar Masterstroke) ताकद मानली जाते.

निहाल आझम पानसरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे पक्षाला मोठा राजकीय फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रभागांमध्ये पानसरे गटाची मते निर्णायक ठरण्याची दाट शक्यता असून, येत्या पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद लक्षणीयरीत्या वाढेल, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत(Ajit Pawar Masterstroke,) आहेत.

या संपूर्ण घडामोडीकडे अजित पवार यांचा पिंपरी–चिंचवडमधील ‘मास्टरस्ट्रोक’ म्हणून पाहिले जात आहे. सेक्युलर मतांचे विभाजन टाळणे, पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, सामाजिक समीकरणे आपल्या बाजूने वळवणे आणि थेट मतदारांशी नाते असलेले नेतृत्व पक्षात सामील करणे—या तिन्ही उद्दिष्टांची पूर्तता राष्ट्रवादी काँग्रेसने एका निर्णयातून साध्य केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात( Ajit Pawar Masterstroke)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00