राहुल कलाटेंच्या भाजप प्रवेशावर गडांतर?
प्रभाग २५ ताथवडे–वाकड–पुनावळेतील कार्यकर्ते आक्रमक
आयात उमेदवारीला तीव्र विरोध; बंडखोरीचे संकेत
पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२५) — आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत अस्वस्थता वाढताना दिसत आहे. वाकड परिसरातील प्रभाग क्रमांक २५ (ताथवडे–वाकड–पुनावळे) येथील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी अन्य पक्षांतून येणाऱ्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाला तीव्र विरोध दर्शवत बंडखोरीचे संकेत दिले (Rahul Kalate BJP Entry) आहेत.
या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विनायक गायकवाड, भाजप शहर उपाध्यक्ष विशाल कलाटे, राम वाकडकर, भाजप ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष चेतन भुजबळ तसेच महिला मोर्चाच्या प्रदेश पदाधिकारी भारती विनोदे, युवा नेते राहुल काटे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली ठाम (Rahul Kalate BJP Entry)भूमिका मांडली.
यावेळी राहुल कलाटे यांच्यासह बाहेरून येणाऱ्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाला स्पष्ट विरोध करण्यात आला. पक्षाने स्थानिक, निष्ठावान आणि वर्षानुवर्षे संघटन मजबूत करण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार शंकर जगताप तसेच भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती (Rahul Kalate BJP Entry)देण्यात आली.
मागण्या मान्य न झाल्यास अधिकृत उमेदवारांचे काम केले जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही कार्यकर्त्यांनी दिला. “गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पक्षासाठी प्रामाणिकपणे मेहनत घेतली आहे. राहुल कलाटे यांनी मागील चार विधानसभा निवडणुकांमध्ये विविध पक्षांकडून उमेदवारी घेतली असून प्रत्येक वेळी त्यांचा पराभव झाला आहे. आता भाजपच शेवटचा पर्याय उरल्याने आयात उमेदवार स्वीकारणे योग्य ठरणार नाही,” असा आरोप यावेळी करण्यात (Rahul Kalate BJP Entry) आला.
ताथवडे–वाकड–पुनावळे परिसरात बाहेरून लादलेले उमेदवार स्वीकारले जाणार नसून स्थानिक पातळीवर सक्षम इच्छुक उमेदवारांची कमतरता नाही, असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. स्थानिक उमेदवारांना संधी दिल्यास ताकदीने निवडणूक लढवू, असेही त्यांनी (Rahul Kalate BJP Entry)स्पष्ट केले.
गत विधानसभा निवडणुकीत या प्रभागातून मोठ्या प्रमाणावर मतदान झाले होते. मात्र अपेक्षित विकासकामे न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी असून यंदा परिवर्तन अटळ असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला. राहुल कलाटेंच्या संभाव्य पक्षप्रवेशामुळे भाजपची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असल्याचाही आरोप करण्यात (Rahul Kalate BJP Entry)आला.
या घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपचे अंतर्गत राजकारण चांगलेच तापले असून, पक्षश्रेष्ठी या बंडखोरीवर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले (Rahul Kalate BJP Entry)आहे.
