Home गुन्हे Kalewadi Murder Case:अपघाताच्या संशयावरून बस चालकाचा खून; पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

Kalewadi Murder Case:अपघाताच्या संशयावरून बस चालकाचा खून; पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात अपघात केल्याच्या संशयावरून बस चालकाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. वाकड पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

by Admin
Spread the love

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन धोंडिबा सोनकांबळे (वय २८) असे खून झालेल्या बस चालकाचे नाव आहे. तो चाकण येथील लक्ष्मी हॉलिडेज ट्रॅव्हल्स कंपनीत बस चालक म्हणून कार्यरत होता. बस चालवत असताना अपघात झाला असावा, या संशयावरून चार जणांनी सचिनला अडवून त्याच्यावर बेदम मारहाण केली. डोक्यात झालेल्या गंभीर मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच (Kalewadi Murder Case) मृत्यू झाला.

या प्रकरणी मयताचा नातेवाईक विठ्ठल सोनकांबळे (वय ३८, रा. मु. पो. दापशेड, ता. रोहा, जि. नांदेड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली (Kalewadi Murder Case ) आहे.

त्यानुसार, पोलिसांनी कंपनीचे व्यवस्थापक कमल चंद, सुपरवायझर वशिष्ट ऊर्फ अजय मुळीक, चालक अजय शेळके आणि हरिदास ऊर्फ पप्पू मोरे या चौघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला(Kalewadi Murder Case )आहे.

या घटनेमागील नेमके कारण काय होते, तसेच आरोपींनी कोणत्या संशयाच्या आधारे हा खून केला, याचा तपास वाकड पोलीस करत आहेत. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुदाम दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, सर्व आरोपींचा शोध व चौकशी सुरू (Kalewadi Murder Case) आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस (Kalewadi Murder Case)करीत आहेत.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00