प्रतिनिधी :महानगरपालिका प्रशासनाने इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला गती देत निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांनी जाहीर केलेला ‘नमामी इंद्रायणी’ हा त्यांचा महत्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट आता प्रत्यक्ष आकार घेण्याच्या दिशेने वाटचाल (Indrayani River Project)करत आहे.
‘व्हीजन-2020’ अभियानातून करण्यात आलेली प्रकल्पाची घोषणा 2019 व 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्येही चर्चेचा विषय ठरली होती. राज्य शासनाच्या पर्यावरण समिती आणि राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मंजुरी मिळण्यात विलंब होत असताना, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण समितीची मान्यता मिळवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तांत्रिक समितीची अखेरची मंजुरी मिळविण्यासाठी पुढाकार(Indrayani River Project) घेतला.
मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महानगरपालिकेच्या इस्टिमेट कमिटीनेही निविदा प्रस्तावाला हिरवा कंदील दिला असून, आता अधिकृत निविदा जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 526 कोटी रुपये खर्चाची कामे करण्यात (Indrayani River Project)येणार आहेत.
पर्यावरणप्रेमी संस्थांच्या सूचनांनुसार तयार केलेला विकास आराखडा शहराच्या मास्टर प्लानशी सुसंगत ठेवण्यात आला आहे. या आराखड्यात विविध ठिकाणी 60 एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच वॉटर एटीएम, सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्ट्रीट फर्निचर, कंपाउंड वॉल, चेन-लिंक फेन्सिंग आणि बायोडायव्हर्सिटी पार्क यांसारख्या सुविधा प्रस्तावित आहेत. केंद्राच्या अमृत-2 उपक्रमांतर्गत हा प्रकल्प राबविण्यातI(ndrayani River Project) येत आहे.
या प्रकल्पाबाबत आमदार महेश लांडगे म्हणाले की,
“इंद्रायणी नदी ही केवळ धार्मिक श्रद्धेची नाही, तर आपल्या संस्कृती, पर्यावरण आणि शहराच्या आरोग्याशी जोडलेली जीवनवाहिनी आहे. निविदा जाहीर झाल्यानंतर प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम डिसेंबर 2025 पासून सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचे मी आभार मानतो. या प्रकल्पामुळे नदी प्रदूषणमुक्त होईल, सुरक्षित व हिरवाईने नटलेले किनारे तयार होतील आणि नागरिकांना स्वच्छ, सुंदर नदीकाठाचा अनुभव मिळेल. प्रकल्प वेळेत आणि उच्च गुणवत्तेने पूर्ण करण्यासाठी आम्ही (Indrayani River Project)कटिबद्ध आहोतं.
