Home माझं पिंपरी चिंचवड Women Felicitation Bhosari:भोसरीत महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ‘रंगजल्लोष’ व ‘बालजत्रा’ सोहळा

Women Felicitation Bhosari:भोसरीत महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ‘रंगजल्लोष’ व ‘बालजत्रा’ सोहळा

by Admin
Spread the love

 

दादांनी वाढदिवस साध्या पद्धतीने, सफाई कामगार आणि घरकामगार महिला भगिनींसोबत साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार या सर्व भगिनींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. अनेक महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि कृतज्ञतेचे भाव पाहण्यासारखे होते. विशेषत: टू-व्हीलर बक्षीस मिळालेल्या भगिनीच्या डोळ्यात आलेले अश्रू उपस्थितांना भावूक (Women Felicitation Bhosari)करून गेले.

 

कार्यक्रमात मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी रसिकांची मने जिंकली. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवली परब, पृथ्वीक प्रताप, धनश्री काडगावकर तसेच बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर यांनी विनोदी आणि मनोरंजक सादरीकरण करून  (Women Felicitation Bhosari)वातावरण रंगतदार केले.

 

लकी ड्रॉद्वारे सोन्याची अंगठी, चांदीची नाणी, ऍक्टिवा टू-व्हीलर अशा आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विजेत्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उत्साहवर्धक  (Women Felicitation Bhosari)
होता.

 

या सोहळ्याच्या निमित्ताने कार्तिकभाऊ लांडगे आणि पै. मल्हारदादा लांडगे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व मान्यवर आणि रसिकांचे स्वागत शिवाजी बारणे यांनी केले. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. जवळपास पंधरा हजारांहून अधिक नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून सोहळा भव्य (Women Felicitation Bhosari)
केला.

या कार्यक्रमाचे आयोजन सिल्वरराईज ग्रुपचे संचालक संतोष सीताराम बारणे यांनी केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00