Home मनोरंजन Tribute To Dharmendra:धर्मेंद्र : रुपेरी पडद्याचा ही-मॅन | श्रद्धांजली लेख

Tribute To Dharmendra:धर्मेंद्र : रुपेरी पडद्याचा ही-मॅन | श्रद्धांजली लेख

धर्मेंद्र यांच्या अभिनयप्रवासाची, गाजलेल्या भूमिका, अॅक्शन आणि रोमॅन्सने भरलेल्या सुवर्णकाळाची भावस्पर्शी स्मरणरचना. खास श्रद्धांजली लेख.

by Admin
Spread the love

“मै जट यमला पगला दिवाना…”ही-मॅन धर्मेंद्र : एक काळ, एक अस्मिता, एक सुवर्णस्वप्न**

 

धर्मेंद्र यांच्या १९६० ते २०२५ या विस्तीर्ण, भव्य आणि तेजस्वी चित्रपट कारकिर्दीचा आढावा घ्यायचा म्हटलं, तर सुरुवात नक्की कुठून करावी—याच संभ्रमात मी आजही हरवून जातो. कारण धर्मेंद्र हे फक्त अभिनेता नव्हते; ते एक युग होते, एक स्वप्न होते, आणि लाखो रसिकांच्या हृदयात कोरलेला एक (Tribute To Dharmendra) भावपूर्ण ठसा होते.

 

गोरा-पान, उंचापुरा, पिळदार देहयष्टी… साठच्या दशकात रुपेरी पडद्यावर अवतरलेला हा देखणा नायक उगवता उगवता, प्रेक्षकांच्या मनाचा धनी  (Tribute To Dharmendra)झाला.

“दिल भी तेरा हम भी तेरे…” म्हणत पदार्पण केलेल्या धर्मेंद्रने खरंच प्रेक्षकांना जिंकून घेतलं—हृदयापासून.

 

भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास जर कधी लिहिला गेला, तर त्यात ‘धर्मेंद्र’ हे प्रकरण विसरून चालणार नाही. अॅक्शन, रोमॅन्स, भावनांचा उन्मेष आणि प्रामाणिकपणाने भारलेला अभिनय—धर्मेंद्र हे सगळ्यांचे सुंदर (Tribute To Dharmendra)मिश्रण होते.

 

दोन बुक्कीत खलनायकाला आडवे पाडणारा…

टकलू शेट्टीवर प्रहार करून त्याला गारद करणारा…

वाघाच्या जबड्यात हात घालणारा निर्भय नायक…

आणि अन्यायाविरुद्ध ज्वालाग्राही चीड बाळगणारा राका!

 

प्रत्येक रुपात धर्मेंद्र उठून दिसत.

 

१९६० च्या दशकातील तरुण मुलींच्या स्वप्नात दररोज विहरणारा हा राजकुमार जेव्हा

“कलियों ने घूंघट खोले…”

असं गुणगुणत पडद्यावर दिसे, तेव्हा सिनेमागृहात श्वास रोखला जाई.

 

त्या काळात राज कपूर, दिलीप कुमार, देवानंद, राजेंद्र कुमार अशा दिग्गजांचा दबदबा असताना, धर्मेंद्र यांनी कोणाशी स्पर्धा न करता, कोणालाही कमी न लेखता, स्वतःची वेगळी अदाकारी घडवली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक शांत ऊर्जेचा प्रवाह होता—प्रामाणिक, स्वाभिमानी  (Tribute To Dharmendra)आणि निर्मळ.

 

**“आई मिलन की बेला”**पासून सुरू झालेला यशाचा प्रवास **“फूल और पत्थर”**सारख्या महत्त्वाच्या चित्रपटांपर्यंत झेपावला. मीनाकुमारीसोबतचा त्यांचा पडद्यावरील जादुई रसायनशास्त्र चर्चेचा विषय (Tribute To Dharmendra)ठरले.

 

धर्मेंद्रने अनेक चित्रपट गाण्याविना देखील लक्षात राहतील असे पात्र साकारले. “यादों की बारात”मधील मोठ्या भावाचा त्यांचा भावस्पर्शी अभिनय, प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका क्षणभर चुकवतो.

 

जितेंद्र, राजेश खन्ना, शशी कपूर, मनोजकुमार यांच्या चित्रपटांची वादळं सुटत असताना देखील, निर्मात्यांनी धर्मेंद्रच्या नावावर अटूट विश्वास ठेवला. कारण ही-मॅन म्हणजे पैसा वसूल!

नंबर वन नसला, तरी कधीच नंबर दोनखाली न उतरणारा हा तेजस्वी नायक.

 

त्यांची असंख्य गाणी आजही काळाच्या ओघात ताजी आहेत—

“पल-पल दिल के पास…”

“आज मौसम बड़ा बेईमान है…”

“झिलमिल सितारों का आँगन होगा…”

“यकीन कर लो मुझे…”

 

धर्मेंद्र–हेमामालिनी ही जोडी ७०–७५ या काळात प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत .(Tribute To Dharmendra) होती.

“रेशमी आँखों वाली…” पासून ते

“ओ मेरी महबूबा…”

पर्यंत ही जोडी लोकांच्या स्वप्नात राहिली.

पडद्यावरचा रोमॅन्स वास्तवात बदलला आणि ड्रीमगर्ल अखेर धर्मेंद्रचीच झाली—ही तर खऱ्या अर्थाने “कहानी किस्मत की”.

 

‘शोले’मधील त्यांचा बेधडक, मोकळा स्वभाव आजही विसरता येत नाही. अमिताभच्या खांद्यावर बसून Mouth Organ वाजवत

“ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे…”

म्हणणारा धर्मेंद्र म्हणजेच भारतीय सिनेमाचा सदाबहार चेहरा.

 

राजकपूरच्या **“मेरा नाम जोकर”**मध्ये त्यांनी म्हटलेला संवाद आजही स्मरणात रेंगाळतो—

“शो मस्ट गो ऑन.”

 

सुमारे २५० हून अधिक चित्रपटांतून त्यांनी अॅक्शन, विनोद, करुणा आणि रोमॅन्स—सगळं काही प्रेक्षकांना दिलं.

“कुत्ते कमीने मैं तुझे छोड़ूंगा नहीं!”

हा संवाद ऐकला की प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट (Tribute To Dharmendra)थांबायचा नाही.

 

धर्मेंद्रची गाणी म्हणजे एक अखंड प्रवाहच—

“आपके हसीन रूख पे…”,

“हमसफर मेरे…”,

“कुछ दिल ने कहा…”,

“क्या नज़ारे क्या सितारे…”,

“कुछ कहता है ये सावन…”

 

आणि “सत्यकाम”मधील त्यांचा जीवनरस ओतप्रोत गीत—

“बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो…”

हा मंत्र जणू त्यांच्या (Tribute To Dharmendra)व्यक्तिमत्त्वाचाच गाभा होता.

 

धर्मेंद्र हे नाव घेताच आजही मनात अनेक गीतांची गुंजारव सुरू होतो. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत एक सुनियोजित सच्चेपणा आणि हृदयाला भिडणारी तीव्र (Tribute To Dharmendra)संवेदना असते.

 

आज ते एक युग म्हणून, एक उज्ज्वल अध्याय म्हणून आणि एक चिरंतन स्मृती म्हणून आपल्यात जिवंत आहेत. अभिनयाची ही आग, हा आविष्कार आणि हा प्रामाणिकपणा—आपल्या सगळ्यांच्या मनात सदैव झळाळत राहो.

लेखन – सुरेश कंक

पिंपरी-चिंचवड मधील साहित्यिक, कवी आणि उत्कट सिनेप्रेमी.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00