Home आरोग्य Eco Pedalers-150km:पिंपरी चिंचवडच्या इको पेडलर्स कडून 26/11 हुतात्म्यांना 150 किमी सायकल यात्रेद्वारे श्रद्धांजली

Eco Pedalers-150km:पिंपरी चिंचवडच्या इको पेडलर्स कडून 26/11 हुतात्म्यांना 150 किमी सायकल यात्रेद्वारे श्रद्धांजली

इको पेडलर सायकलिस्टांनी चिंचवड ते गेटवे ऑफ इंडिया अशी 150 किमीची रात्रीची सायकल मोहीम पूर्ण करून 26/11 हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. देशभक्ती, फिटनेस आणि सामाजिक जाणिवेचा संदेश देणारी प्रेरणादायी कामगिरी.

by Admin
Spread the love

 

या मोहिमेत सहभागी झालेले चिंचवडचे सायकलिस्ट –

उमेश गोलांडे, बाबासाहेब राक्षे, बाबा भोईर, मिलिंद भोसले, प्रदीप खैरे, अजित बालवडकर, अतुल कोल्हापुरे, अशोक चांदगुडे आणि महेश बच्छाव –

या सर्वांनी चिंचवडमधील  चापेकर चौक  ते मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया असा तब्बल 150 किमीचा प्रवास रात्रीच्या वेळेत(Eco Pedalers-150km)  सायकलवर पूर्ण केला.

 

ही मोहीम शनिवार, 22 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता सुरू झाली आणि पहाटे 5 वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचत यशस्वीरीत्या पूर्ण झाली. अंधार, थकवा, हवामानातील बदल, वाहतूक आणि मार्गातील अडथळे यांचा सामना करत या सायकल वीरांनी आपली जिद्द आणि शारीरिक क्षमता दाखवून( Eco Pedalers-150km)दिली.

 

गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचल्यावर त्यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिक आणि सुरक्षा दलातील जवानांना नतमस्तक होऊन श्रद्धांजली वाहिली. या उपक्रमातून त्यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांचे स्मरण करून देशप्रेम, एकता आणि सामाजिक जबाबदारीचा प्रभावी संदेश समाजापर्यंत (Eco Pedalers-150km)पोहोचवला.

 

इको पेडलिस्टच्या या मोहिमेत आरोग्य, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जागरुकता आणि देशभक्ती—या सर्व मूल्यांचा सुंदर संगम दिसून आला.

पिंपरी चिंचवडमधील या सायकल वीरांचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून (Eco Pedalers-150km)केले जात आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00