आमच्या व्हाट्सअप ग्रुपवर ऍड होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा
https://chat.whatsapp.com/IKyA09noAjU4kJjQm9a6uT?mode=hqrt3
या वर्षी आमदार लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात १०० हून अधिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, क्रीडा स्पर्धा यांचा समावेश आहे. “आयुष्याचा सुवर्णमहोत्सव आणि समाजसेवेचा रौप्य महोत्सव” या संकल्पनेतून हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. दि. २३ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान प्रत्येक कार्यक्रमस्थळी घरकामगार आणि सफाई कामगार ( Pimpri Women Recognition) सन्मान केला जाईल.
अमोल बांगर म्हणाले, “दिवसभर कष्ट करून, घर चालवत, मुलांच्या भवितव्याची काळजी घेतल्या तरीही नवी उमेद घेऊन उठणाऱ्या या महिलांचा संघर्ष शहरातील कामगार वस्त्यांमध्ये रोज दिसून येतो. या महिलांना इतक्या मोठ्या प्रमाणावर ( Pimpri Women Recognition) सन्मान मिळणे ही पहिलीच वेळ आहे.”
—
महिला सक्षमीकरणाचे ठोस उपक्रम
महिला सक्षमीकरणावर भर देणारे आमदार महेश लांडगे यांनाच राज्यातील सर्वात मोठी इंद्रायणी थडी जत्रा आयोजित करून हजारो महिलांना स्वावलंबी बनण्याची संधी दिली आहे. जत्रेत १ हजाराहून अधिक बचतगटांना व्यवसायाची संधी, विक्रीच्या सुविधा आणि आर्थिक पाठबळ दिले गेले. या कार्याचा आदर्श घेतल्यामुळे घरकामगार व सफाई कामगार महिलांचा ( Pimpri Women Recognition)सन्मान उपक्रम राबवला जात आहे.
आरोग्य, शिक्षण आणि लाभ योजनांवर विशेष भर
उपक्रमात महिलांच्या आरोग्यविषयक समस्या, सरकारी योजनांचा लाभ, सामाजिक समानतेचे हक्क, मोफत रक्तदान योजना, वैद्यकीय सुविधा आणि मुलांच्या शिक्षणाची माहिती या विषयांवर विशेष मार्गदर्शन दिले जाईल. अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरु असून आतापर्यंत सुमारे ४,७०० महिलांनी अर्ज भरला आहे. सर्व अर्जदार महिलांना मानपत्र, भेटवस्तू आणि ( Pimpri Women Recognition) शासकीय योजनांची माहिती दिली जाईल.
दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी भोसरी येथील गावजत्रा मैदानात आमदार लांडगे यांचा वाढदिवस साजरा केला जाईल आणि या वेळी घरकामगार- कष्टकरी महिला सन्मानित केल्या जातील. नोंदणीसाठी दि. २५ नोव्हेंबरपर्यंत खालील लिंकवर फॉर्म भरता येईल: https://forms.gle/TpvSJanJrLK27BrC6 किंवा अमोल बांगर – 7709 700 999 यांच्याशी संपर्क साधता येईल.
अमोल बांगर म्हणाले, “महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण यासाठी आमदार महेश लांडगे नेहमी पुढाकार घेत आहेत. घरकामगार आणि कष्टकरी महिलांचा सन्मान देणे हा उद्देश नाही, तर त्यांच्या गरजांपर्यंत शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. संघर्ष करत राहणाऱ्या प्रत्येक महिलेला ही मदत पोहोचावी, हीच आमची भूमिका ( Pimpri Women Recognition) आहे.”
