Home प्रेरणा / यशकथा Thergaon School Event: थेरगावातील बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम | क्रांतिकारकांच्या शौर्यगाथा” — सुभाष चव्हाण

Thergaon School Event: थेरगावातील बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम | क्रांतिकारकांच्या शौर्यगाथा” — सुभाष चव्हाण

बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम | थेरगावातील क्रांतिकारक प्रेरणादायी उपक्रम

by Admin
Spread the love

टीम एमपीसी :थेरगाव येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, गणेशनगर येथे बिरसा मुंडा जयंतीनिमित्त “हुतात्म्यांच्या शौर्यकथांचे कथन” हा विद्यार्थी उद्देश्याचा कार्यक्रम (Thergaon School Event) उत्साहात पार पडला.

 

या कार्यक्रमासाठी “क्रांतिकारकांचा आत्मयज्ञ” या पुस्तकाचे लेखक सुभाष चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक (Thergaon School Event) यांनी स्थान घेतले.

प्रतिमा पूजन व ‘वंदे मातरम्’ घोषाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

 

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रमुख पाहुणे सुभाष चव्हाण म्हणाले,

“स्वातंत्र्यलढ्याचा जाज्वल्य इतिहास प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासला पाहिजे. वस्ताद लहुजी साळवे, बिरसा मुंडा, उमाजी नाईक, चापेकर बंधू, लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, मदनलाल धिंग्रा, हुतात्मा बाबू गेणू, विष्णू पिंगळे अशा असंख्य क्रांतिकारकांनी देशासाठी आयुष्य समर्पित केले. त्यांच्या कार्याचे स्मरण विद्यार्थ्यांना नवचैतन्य आणि जीवनमूल्यांची प्रेरणा देते. क्रांतीच्या इतिहासातील ग्रंथ वाचणे (Thergaon School Event)हा प्रत्येक विद्यार्थी मित्राचा कटाक्ष असावा.”

 

अध्यक्ष सुरेश कंक यांनी आपल्या मनोगतात सांगितले,

“‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’ हे विद्यार्थ्यांनी आचरणातून सिद्ध केले पाहिजे. स्वयंशिस्त, देशभक्ती, माणुसकी, निस्वार्थता, ईश्वरनिष्ठा आणि मातृ–पितृभक्ती या मूल्यांनी व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते. नव्या युगातील तंत्रज्ञान आणि परिवर्तनशील विचार आत्मसात करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे.”

यावेळी कंक यांनी क्रांतिकारक चापेकर बंधू, राणी लक्ष्मीबाई आणि वंदन क्रांतिकारका या कविता (Thergaon School Event)गायनातून सादर करून विद्यार्थ्यांचे उत्साहवर्धन केले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात अश्विनी दळवी, योगेश्वरी जाधव, दीप्ती बंदपट्टे, शाम मस्तूद, मनीषा वाघ, रंजना कांबळे, शिवाजी पोळ आणि नलिनी पंडित यांनी(Thergaon School Event) सक्रिय सहभाग नोंदविला.

सूत्रसंचालन सुनीता घोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन (Thergaon School Event)अंजली सुमंत यांनी केले.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00