Home माझं पिंपरी चिंचवड Sanvidhan Value:शिक्षकांनी संविधान मूल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी – संविधान अभ्यासक नुरखॉं पठाणपिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे मुख्याध्यापकांसाठी विशेष व्याख्यान

Sanvidhan Value:शिक्षकांनी संविधान मूल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी – संविधान अभ्यासक नुरखॉं पठाणपिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे मुख्याध्यापकांसाठी विशेष व्याख्यान

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल (Sanvidhan Value) आदर, जाणीव आणि कर्तव्यबुद्धी रुजवण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने सक्रिय भूमिका घेतली पाहिजे, असे मत संविधान अभ्यासक नुरखॉं पठाण यांनी व्यक्त केले. संविधान हा राष्ट्राचा मूलग्रंथ असून त्यातील मूल्यांची बीजे विद्यार्थ्यांच्या मनात घट्ट रोविणे ही शिक्षण क्षेत्राची महत्त्वाची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

 

संविधान दिन (२६ नोव्हेंबर) निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्याध्यापकांसाठी चिंचवड स्टेशन येथील ॲटो क्लस्टरमध्ये विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. आयुक्त व प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाला उपायुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिकेच्या विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.भारतीयसंविधानाच्या (Sanvidhan Value) उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 

या माध्यमातून संविधानातील तत्त्वे, मूलभूत मूल्ये आणि नागरिकांचे कर्तव्य यांची पुन्हा एकदा उजळणी झाली. त्यानंतर नुरखॉं पठाण यांनी संविधानाची संकल्पना, नागरिकांचा संविधानाशी असलेला संबंध, दैनंदिन जीवनातील संविधानाचे महत्त्व, त्याचा उपयोग आणि स्वातंत्र्य चळवळीतील सामाजिक-राजकीय संघर्ष यावर सविस्तर मार्गदर्शन केले. संविधान निर्मितीची ऐतिहासिक प्रक्रिया, मसुदा समितीचे योगदान आणि भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये यांवरही त्यांनी प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी, तर(Sanvidhan Value) प्रास्ताविक संगीता बांगर यांनी केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00