Home गुन्हे Mhalunge MIDC Drug Seizure:म्हाळुंगे एमआयडीसी परिसरात पोलिसांची मोठी कारवाई; जवळपास १० लाखांचा मेफेड्रॉन जप्त

Mhalunge MIDC Drug Seizure:म्हाळुंगे एमआयडीसी परिसरात पोलिसांची मोठी कारवाई; जवळपास १० लाखांचा मेफेड्रॉन जप्त

by Admin
CRIME
Spread the love

म्हाळुंगे (प्रतिनिधी):
म्हाळुंगे एमआयडीसी परिसरात पोलिसांनी छापा टाकत सुमारे नऊ लाख ८४ हजार रुपयांचा मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणात तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (१० नोव्हेंबर) मध्यरात्री (Mhalunge MIDC Drug Seizure) मोई गावाच्या हद्दीतील फलकेवस्ती भागात करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे इम्तियाज अहमद खान (३२), फैसल नवाज चौधरी (२५, रा. मोई, ता. खेड) आणि मोहम्मद मुस्तफा शेख (२५, रा. वडाळा, मुंबई) अशी आहेत. गुन्हे शाखा युनिट चारमधील पोलीस शिपाई सांगर जैनक यांनी या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद(Mhalunge MIDC Drug Seizure) दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींकडून ७९ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे ९ लाख ८४ हजार ७०० रुपये इतकी आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी हे अमली पदार्थ विक्रीसाठी(Mhalunge MIDC Drug Seizure) आणल्याचे उघड झाले आहे.

अटक केलेल्या आरोपींकडून अधिक माहिती घेऊन त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून(Mhalunge MIDC Drug Seizure) पुढील तपास सुरू आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00