Home संस्कृती Bhosari Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीला भक्तांची अलोट गर्दी

Bhosari Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीला भक्तांची अलोट गर्दी

भोसरीत २४ गणेश मंडळांच्या मूर्तींचे उत्साहात विसर्जन; ढोल-ताशा, लेझीम आणि आकर्षक रथांनी मिरवणुकीत रंगत, भाविकांची मोठी गर्दी.

by Admin
Spread the love

(भोसरी ): ढोल-ताशा, ढोल-लेझीम आणि डीजेच्या गजरात गणपती बाप्पाचा जयजयकार करत भोसरी परिसरातील गणेश मंडळांच्या मूर्तींचे गुरुवारी (दि. २४) उत्साहात विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली(Bhosari Ganesh Visarjan 2026) होती.

 

भोसरी येथील बापूजी बुवा चौकात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेश मंडळांच्या स्वागतासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. यावेळी मंडळांच्या अध्यक्षांचा पुष्पहार व श्रीफळ देऊन उपायुक्त अतुल पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि कार्यकारी अभियंता किरण अंदुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात(Bhosari Ganesh Visarjan 2026) आला.

 

बापूजी बुवा चौकातून दुपारी एक वाजता वीर हनुमान मित्र मंडळ, भोसरी गावठाण यांच्या मिरवणुकीने सुरुवात झाली. विघ्नहर्ता मित्र मंडळ, विठ्ठलनगर-लांडेवाडी या मंडळाच्या मिरवणुकीने विसर्जन सोहळ्याची सांगता झाली. भोसरी परिसरातील एकूण २४ गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात (Bhosari Ganesh Visarjan 2026) आले.

 

मिरवणुकीत छत्रपती श्री शिवाजी तरुण मंडळाचा राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या रथाने लक्ष वेधून घेतले. पठारे-लांडगे लिंबाची तालीम व्यायाम मंडळाचा विद्युत रोषणाईतील रथही आकर्षण ठरला. लांडेवाडीतील नवमहाराष्ट्र तरुण मंडळाने जगन्नाथ रथासह पारंपरिक केरळी कलाकारांच्या वाद्यांच्या साथीने काढलेल्या मिरवणुकीने रंगत (Bhosari Ganesh Visarjan 2026) आणली.

 

विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी भोसरी पोलीस, वाहतूक शाखा, सीआरपीएफचे जवान तसेच लोहगड क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. मिरवणुकीचे सूत्रसंचालन किशोर केदारी यांनी(Bhosari Ganesh Visarjan 2026) केले.

 

यावेळी कार्यालयीन अधीक्षक शिवाजी खेडेकर, कार्यकारी अभियंता बाळू लांडे, उपअभियंता राजीव गाटुले, नीलेश केदार, कनिष्ठ अभियंता राधवेंद्र धर्मा कांबळे, मुख्य लिपिक धर्मा गंभीर, इस्माईल शेख यांच्यासह किशोर केदारी, प्रदीप गायकवाड, उमेश जगताप, जयश्री भागवत, राधिका पिंगळे, विद्या कवडे, भानुदास तापकीर आदी उपस्थित(Bhosari Ganesh Visarjan 2026) होते.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00