प्रतिनिधी: भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भोसरी परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांच्या संकल्पनेतून, भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रथमच बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘जाणता राजा’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य प्रयोग ६ आणि ७ डिसेंबर रोजी सादर होणार(Janta Raja )आहे.
प्रेरणा / यशकथा
Yashwant Venu Award:यशवंतराव यांचे राजकारण समन्वयवादी! – डॉ. श्रीपाल सबनीस
प्रतिनिधी:यशवंतराव चव्हाण यांची राजकीय वाटचाल समन्वयवादी होती, त्यामुळे आजच्या पिढीतील नेत्यांनी ‘यशवंतनीती’ आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. ऑटोक्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, चिंचवड येथे गुरुवार, २७ नोव्हेंबर रोजी आयोजित ‘यशवंत – वेणू सन्मान’ प्रदान(Yashwant Venu Award) सोहळ्यात ते बोलत होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड विभागातर्फे लातूरचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पाटील कव्हेकर यांना यशवंत – वेणू सन्मान प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर होते. पद्मश्री गिरीश प्रभुणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांच्या उपस्थितीने(Yashwant Venu Award) व्यासपीठ उजळून निघाले.
याप्रसंगी रुद्रवीर टेक्नो इंडस्ट्रीजचे संचालक विशाल पलांडे (यशवंतराव चव्हाण युवा उद्योजक पुरस्कार) आणि ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे (यशवंतराव चव्हाण सह्याद्री भला माणूस पुरस्कार) यांनाही गौरविण्यात(Yashwant Venu Award )आले.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “यशवंतराव आणि वेणूताईंचे दाम्पत्यजीवन परस्परांवरील निखळ समर्पणाचे उदाहरण होते. यशवंतरावांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला वेणूताईंनी शांत, सुगंधी सहचारिणीप्रमाणे साथ दिली. कव्हेकर दांपत्याचे सामाजिक योगदान व्यापक असून त्यांच्या कार्यात यशवंत–वेणू जोडीचे प्रतिबिंब दिसते; त्यामुळेच ते या सन्मानास (Yashwant Venu Award) पात्र आहेत.”
पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी, “यशवंतरावांनी विकासाची धार बहुजनांपर्यंत पोहोचवली,” असे मत व्यक्त केले. तर सुनीताराजे पवार म्हणाल्या, “देश कृषिप्रधान असूनही शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे. यशवंतरावांनी सांस्कृतिक जीवनातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. वेणूताई त्यांच्या मागे एक शांत ज्योत(Yashwant Venu Award) बनून उभ्या राहिल्या.”
सन्मान स्वीकारताना शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले, “यशवंतराव हे खऱ्या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. वेणूताई त्यांच्यासाठी सावलीप्रमाणे कायम साथ करणाऱ्या होत्या. महाराष्ट्र हा फक्त मराठ्यांचा नाही तर संपूर्ण मराठी जनतेचा आहे, ही यशवंतरावांची ठाम भूमिका होती. २०४० पर्यंत भारत महासत्ता बनेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त (Yashwant Venu Award)केला.
प्रतिभा पाटील कव्हेकर म्हणाल्या, “हा गौरव हा आमच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे,” असे सांगून त्यांनी सामाजिक कार्याचा आढावा दिला. विशाल पलांडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करण्याचा प्रवास सांगितला, तर नंदकुमार मुरडे यांनी कृतज्ञता व्यक्त (Yashwant Venu Award)केली.
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजन आणि नितीन देशमुख लिखित ‘यशवंतराव’ कवितेचे राजेंद्र वाघ यांनी केलेल्या गायनाने झाली. प्रास्ताविक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. सुदाम भोरे यांनी स्वागत केले. श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी ‘यशवंतराव इतिहासाचे सुवर्णपान’ या विषयावर व्याख्यान दिले. मानपत्राचे वाचन मानसी चिटणीस यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. पंडित विद्यासागर यांनी, “केंद्र सरकारमध्ये चार महत्त्वाची खाती सांभाळणारे यशवंतराव हे महाराष्ट्रातील एकमेव नेते होते,” असे (Yashwant Venu Award) सांगितले.
कार्यक्रमाच्या संयोजनात अरुण गराडे, इंद्रजित पाटोळे, प्रतिमा काळे, जयवंत भोसले, प्रा. प्रभाकर दाभाडे, राजू जाधव आणि प्रदीप गांधीलीकर यांनी सहकार्य केले. सुत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले, तर आभारप्रदर्शन संगीता झिंजुरके (Yashwant Venu Award)यांनी केले.
Birthday Eye Camp:आमदार शंकर जगताप यांचा वर्षपूर्ती सोहळा व माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
प्रतिनिधी :चिंचवड विधानसभा आमदार शंकर जगताप यांच्या आमदारकीच्या प्रथम वर्धापनाच्या निमित्ताने आणि माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचा वाढदिवस असे दोन सोहळे एकत्र आल्याने हा आनंदी क्षण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा झाला. राजकीय, सामाजिक, व्यापारी तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनी आणि सोशल मीडियाद्वारे त्यांना मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांच्या जनसेवेची सर्वत्र होत असलेली प्रशंसा लक्षात घेऊन नागरिकांनीही मोठ्या आपुलकीने( Birthday Eye Camp)शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी – गेली 25 वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे महिनाभर साजरे होणे ही एक विलक्षण गोष्ट आहे. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. यावर्षीचा वाढदिवस सफाई व घरकामगार माता-भगिनींना समर्पित केला. त्यांचा सन्मान करताना विशेष आनंद झाला. माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत कष्टकऱ्यांचा गौरव करण्यात आला आणि विधायक पद्धतीने अभिष्ठचिंतन पार पडले. या समारंभातून समर्पित भावनेतून समाजसेवा करण्यासाठी आणखी सकारात्मक ऊर्जा मिळाली, अशी भावनिक प्रतिक्रिया आमदार महेश लांडगे यांनी दिली.
भोसरी येथील ऐतिहासिक गावजत्रा मैदानावर वाढदिवस अभिष्ठचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो नागरिकांनी येथे उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला. महिनाभराच्या कालावधीत भोसरी विधानसभा, शहर आणि ग्रामीण भागात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक असे 100 हून अधिक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांमुळे पिंपरी-चिंचवड शहरात उत्सवमय वातावरण निर्माण झाले होते.
या आनंददायी प्रसंगी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, स्थानिक मित्रपरिवार तसेच राज्यस्तरीय अनेक मान्यवरांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले तसेच कॅबिनेट मंत्री, विधान परिषदेचे सदस्य, आमदार आणि शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व औद्योगिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी लांडगे यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

महिनाभरात आयोजित रक्तदान शिबिरे आणि आरोग्य शिबिरांमधून 2 हजारांहून अधिक पिशव्या रक्तसंकलन झाले. 10 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी आरोग्य शिबिरांमधील सेवांचा लाभ घेतला. महिलांसाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रबोधनात्मक उपक्रमांमुळे शहरात उत्साहाचे वातावरण होते. विशेषत: हिंदुभूषण क्रीडा महोत्सवामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात सुमारे 10 हजार युवक-युवतींनी सहभाग नोंदवून क्रीडाक्षेत्रात भर टाकली. यावर्षीचा वाढदिवस सफाई व घरकामगार माता-भगिनींना समर्पित करण्यात आला. या निमित्त 4 हजार 320 महिलांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात आले.
—
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली 2014 पासून शहरात सकारात्मक ऊर्जेने काम करण्याची संधी मिळाली. माय-बाप पिंपरी-चिंचवडकरांनी ठेवलेला विश्वास हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. माझे सहकारी आणि मित्रपरिवार यांनी या सामाजिक कार्याचा वसा जपला आहे. या सामाजिक उत्सवामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये समाजाभिमुख कार्याची नवी परिभाषा आकाराला आली आहे. पुढील काळात देव, देश, धर्म आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी तसेच शहराच्या शाश्वत विकासासाठी समर्पित भावनेने कार्यरत राहीन.
– महेश लांडगे
आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे
JP Health Drive:ज्ञान प्रबोधिनी निगडी पालक महासंघाचे ‘आरोग्यव्रत ’ व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी:ज्ञान प्रबोधिनी निगडी पालक महासंघाच्या वतीने आयोजित ‘आरोग्यव्रत ’ व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खेळाच्या उद्देशाने सुरुवात झालेला पालकांचा छोटा गट आज सात विभागांत कार्यरत असून शालेय विद्यार्थ्यांसह पालक आणि समाज या स्तरावर विविध उपक्रम राबवित आहे. महासंघाची व्याप्ती सातत्याने वाढत असून आरोग्य आणि क्रीडा हे दोन प्रमुख (JP Health Drive) केंद्रबिंदू बनले आहेत.
यावर्षीच्या क्रीडा उपक्रमांची सुरुवात थोड्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आली. शाळेतील सर्व पालकांसह परिसरातील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात सहभागी पालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात रक्त तपासणी, साखर, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड, बीपी, हिमोग्लोबिन तसेच उंची–वजन मोजमाप समाविष्ट होते. त्यानंतर फिजिकल टेस्ट घेण्यात आल्या ज्यात बारा किलोमीटर चालणे किंवा धावणे, एक किलोमीटर रन, एक मिनिट पुष-अप आदी चाचण्यांचा (JP Health Drive) समावेश होता.
प्रत्येक सहभागी पालकासाठी वैयक्तिक व्यायाम कार्यक्रम तयार करून तो रोज सकाळी सात ते आठ या वेळेत शाळेच्या क्रीडांगणावर घेतला जात आहे. हा उपक्रम 26 जानेवारीपर्यंत चालणार असून शेवटी पुन्हा तपासणी करून प्रत्येक पालकातील आरोग्यदृष्ट्या झालेले बदल दाखवले जाणार आहेत. या उपक्रमात साडेतीनशेहून अधिक (JP Health Drive) पालक सहभागी झाले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील पालक महासंघ आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावर्षी हे शिबिर 22 नोव्हेंबर रोजी पार पडले. सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने शिबिराचे महत्त्व अधिक वाढले होते. या शिबिरात तब्बल 125 जणांनी स्वेच्छेने रक्तदान(JP Health Drive) केले.
ज्ञान प्रबोधिनी पालक महासंघाने आरोग्य, क्रीडा आणि समाजोपयोगी उपक्रमांचा समन्वय साधत केलेले हे आयोजन समाजासाठी प्रेरणादायी (JP Health Drive) ठरले आहे.
Taras Kivale Event:किवळे येथे राजेंद्र तरस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रम
प्रतिनिधी :शिवसेना युवा नेते राजेंद्र तरस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र. १६ मधील किवळे, रावेत, मामुर्डी, साईनगर, विकास नगर, गुरुद्वारा आणि वाल्हेकरवाडी परिसरातील महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर खेळ व पैठणीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रथम क्रमांकाच्या विजेत्या महिलेला थेट फोर व्हीलर कार बक्षीस म्हणून देण्यात येणार (Taras Kivale Event)आहे.
हा विशेष सन्मान सोहळा शनिवार, २९ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता मुकाई चौक, किवळे गुप्ता मैदान येथे होणार आहे. युवानेते राजेंद्र बाळासाहेब तरस यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात येत असून ऐश्वर्या राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनतर्फे कार्यक्रमाचे आयोजन (Taras Kivale Event) केले आहे.
महिलांसाठी विविध आकर्षक बक्षिसांची सोय करण्यात आली आहे. पहिला क्रमांक मिळवणाऱ्या महिलेला फोर व्हीलर कार, तर दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला ऍक्टिवा दुचाकी प्रदान केली जाणार आहे. याशिवाय एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, शिलाई मशीन, कुलर, ओटीजी, इलेक्ट्रिक किटली, डिनर सेट आणि इतर अनेक घरगुती वस्तूंचा समावेश असलेली बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच २० लकी ड्रॉ बक्षिसांचाही कार्यक्रमात(Taras Kivale Event) समावेश आहे.
Constitution Day PCMC:पिंपरी चिंचवड : संविधान दिन व महात्मा फुले स्मृतीदिनानिमित्त तीन दिवसीय कार्यक्रम
पिंपरी | संविधान दिन तसेच क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने २६ ते २८ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसीय प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भिमसृष्टी, पिंपरी येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ हे सर्व कार्यक्रम पार(Constitution Day PCMC ) पडणार आहेत.
२६ नोव्हेंबर – प्रबोधनात्मक गीत गायन
कार्यक्रमाची सुरुवात बुधवार, दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर, मुंबई यांच्या प्रबोधनात्मक गीतांच्या कार्यक्रमाने होणार(Constitution Day PCMC ) आहे.
या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत – अशोक गायकवाड आणि स्वप्नील पवार.
2७ नोव्हेंबर – विविध प्रबोधनपर कार्यक्रमांची मालिका
१) दुपारी ३.३० वाजता – प्रबोधनात्मक कार्यक्रम
सादरकर्ते : संतोष जोंधळे आणि सहकारी
२) सायं. ५.०० वाजता – प्रबोधनपर कार्यक्रम : जागर संविधानाचा
सादरकर्ते : चंद्रकांत शिंदे, रेश्मा सोनवणे, राधा खुडे, अजय क्षीरसागर व सहकारी
३) सायं. ७.०० वाजता – क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन गीत(Constitution Day PCMC ) कार्यक्रम
सादरकर्ते : राहुल शिंदे
४) सायं. ७.३० वाजता – जागर क्रांतिसूर्याचा : प्रबोधनपर कार्यक्रम
सादरकर्ते : शिरीष पवार व सहकारी
२८ नोव्हेंबर – महात्मा फुले यांच्या कार्याचा जागर
सायं. ४.३० वाजता – महात्मा फुले स्मृतिदिन व्याख्यान
व्याख्यानाचा विषय
“महात्मा फुले यांचे शैक्षणिक धोरण आणि सामाजिक क्रांती”
व्याख्याते
डॉ. सुखदेव थोरात – ज्येष्ठ अर्थतज्ञ व माजी अध्यक्ष(Constitution Day PCMC ), विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), भारत सरकार
सर्व कार्यक्रमांचे (Constitution Day PCMC )ठिकाण :
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ (भिमसृष्टी), पिंपरी, पुणे – १८.
या तीन दिवसीय कार्यक्रमांद्वारे महापालिका संविधान, सामाजिक जागरूकता, शैक्षणिक विचार आणि सामाजिक परिवर्तनातील महात्मा फुले यांच्या योगदानाची जनजागृती करत आहे. प्रबोधनात्मक गीत, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना प्रेरणा देण्याचे उद्दिष्ट यामागे (Constitution Day PCMC ) आहे.
Celebrity Privacy Issue.:धर्मेंद्र : हिंदी चित्रपटसृष्टीतील मर्दानी प्रतिमेचा शेवटचा प्रवास आणि पुन्हा एकदा उभा राहिलेला संवेदनशील प्रश्न
हिंदी चित्रपटसृष्टीत ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे, अस्सल मर्दानी व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक ठरलेले धर्मेंद्र यांचे काल निधन झाले. त्यांच्या जाण्याची बातमी दिग्गजांपासून सर्वसामान्यांपर्यंत दुःखाची लाट निर्माण करणारी ठरली. पण यापेक्षा अधिक चर्चेत राहिला तो त्यांचा अंत्यविधी. देओल कुटुंबाने अत्यंत गोपनीयतेत, कोणालाही न सांगता संस्कार पार पाडले आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला जाणीवपूर्वक लांब ठेवले. या निर्णयामुळे पुन्हा एकदा तोच प्रश्न अनेकांना पडला की प्रसिद्ध व्यक्ती झाल्यावर माणसाचे खासगी जीवन इतके का (Celebrity Privacy Issue) संपुष्टात येते?
धर्मेंद्र यांचा प्रवास हा साधेपणातून सुपरस्टारकडे नेणाऱ्या कहाणीचा उत्तम नमुना आहे. साध्या शेतकरी परिवारातून आलेल्या धर्मेंद्र यांच्याकडे सुरुवातीला ना कोणाचे पाठबळ होते, ना मोठी ओळख. मात्र त्यांच्या मेहनतीने, अथक जिद्दीने, खडतर संघर्षाने आणि मर्दानी व्यक्तिमत्त्वाने त्यांनी मुंबईच्या रुपेरी पडद्यावर अधिराज्य मिळवले. अभिनयशैली, संवादफेक, देखणे रूप आणि प्रचंड चार्म यांच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी (Celebrity Privacy Issue) स्थान निर्माण केले.
त्यांच्या पडद्यावरील प्रतिमेपेक्षा पडद्याबाहेरचे व्यक्तिमत्त्व अधिक माणुसकीपूर्ण होते. अनेकांना दिलदारपणे मदत करणे, नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणे, आणि सर्व स्तरातील लोकांशी मनमोकळेपणाने वागणे – ह्या गुणांमुळे धर्मेंद्र फक्त सुपरस्टार नसून इंडस्ट्रीतील सर्वांचे आपले म्हणून ओळखले जात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार होते. विवाहित असताना हेमामालिनी यांच्याशी विवाहबद्ध झाले, काही काळ ते लपवले गेले, त्याबाबत वाद झाले; परंतु त्यांच्या चाहत्यांनी शेवटी हा निर्णयही स्वीकारला. कारण धर्मेंद्र यांचे आयुष्य हे नाटक नव्हते, ते (Celebrity Privacy Issue)मनापासून जगलेले जीवन होते.
वय वाढत असताना सिनेमातील उपस्थिती कमी झाली, पण त्यांनी चाहत्यांशी संपर्क कायम ठेवला. फॉर्महाऊसवरून शेअर केलेले त्यांच्या साध्या जीवनातील व्हिडिओ लोकांना अतिशय भावले. काही वेळा ते चिंतन करताना, तर कधी शेतात फिरताना दिसत. त्यांचे सौम्य हास्य, शांत बोलणे आणि साधेपणा (Celebrity Privacy Issue)या व्हिडिओंतून स्पष्ट दिसत असे.
अलीकडे प्रकृती ढासळल्याने त्यांची तब्येत चिंताजनक झाली. याच काळात काही इलेक्ट्रॉनिक चॅनेल्सनी त्यांच्या आजाराविषयी अर्धवट माहिती, अंदाज आणि अफवा पसरवल्या. कुटुंबाच्या भावनांचा विचार न करता दिल्या जाणाऱ्या अशा बातम्या देओल परिवाराला मनस्ताप देणाऱ्या ठरल्या. प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनातले खास क्षणही खाजगी नसतात, त्यातही संकटकाळात संवेदनशीलतेने वागण्याची जबाबदारी मीडिया विसरतो, अशी भावना पुन्हा (Celebrity Privacy Issue)एकदा चर्चेत आली.
कुटुंबाने याच कारणामुळे धर्मेंद्र यांच्या अंत्यविधीसंदर्भात कुणालाही माहिती दिली नाही. चाहत्यांना यात सामील होता आले नाही, ही खंत अनेकांच्या मनात कायम राहील. ज्यांनी आयुष्यभर लोकांचे मनोरंजन केले, त्यांना शेवटचा निरोप देण्याची संधी चाहत्यांना मिळाली नाही, ही वेदना मोठी(Celebrity Privacy Issue) आहे.
मीडियाचे काम नक्कीच जनतेपर्यंत माहिती पोहोचवणे आहे. पण ही माहिती सत्य, पडताळलेली आणि संवेदनशीलतेची जाणीव ठेवून दिली जाणे तितकेच आवश्यक आहे. अफवांच्या नावाखाली प्रसिद्धीची स्पर्धा वाढवताना समाजातील भावनांना तडा जातो, हे वारंवार सिद्ध झाले आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाने हा मुद्दा पुन्हा(Celebrity Privacy Issue) अधोरेखित झाला.
पद्मभूषण धर्मेंद्र यांचे जीवन हे मेहनत, माणुसकी, नात्यांवरील प्रेम आणि साधेपणा या सर्वांचे सुंदर मिश्रण होते. त्यांच्या जाण्याने एक युग संपले, पण त्यांची उबदार व्यक्तिमत्त्वाची आठवण कायम राहील. पडद्यावरील त्यांची ताकदीची प्रतिमा आणि पडद्यामागचा मृदू स्वभाव – या दोन्हींचा गोलाकार संगम असलेली ही व्यक्ती आता इतिहासाचा भाग झाली (Celebrity Privacy Issue)आहे.
धर्मेंद्र यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.
विवेक दिगंबरराव कुलकर्णी
पिंपरी-चिंचवड: टाकाऊ वस्तूंनी साकारली नवनिर्मिती, आरोग्य विभागाने शहराची सजावट केली
प्रतिनिधी :पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छता आणि सौंदर्यनिर्मितीचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने ‘टाकाऊ वस्तूंपासून सर्जनशीलता’ या संकल्पनेला नवीन रूप देत, शहरातील टाकाऊ वस्तूंमधून आकर्षक कलाकृती तयार करण्याचा उपक्रम राबवला आहे. ही कलाकृती केवळ नजरेत भरणारी नसून पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेला चालना देणारी (Pimpri Chinchwad beautification) ठरत आहेत.
शहरातील संवेदनशील ठिकाणांवर हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे. यामध्ये प्रभाग १७ बिजलीनगर, प्रभाग २२ शांती चौक काळेवाडी तसेच प्रभाग ०५ सखुबाई गवळी उद्यान, आळंदी रोड, भोसरी या भागातील सार्वजनिक जागा रंगतदार, आकर्षक कलाकृतींनी सजवण्यात (Pimpri Chinchwad beautification) आल्या आहेत.
सफाई सेवकांनी टाकाऊ टायर, प्लास्टिकचे डबे, बाटल्या, लोखंडी फ्रेम्स, पाइप्स यांसारख्या वस्तूंचा कल्पकतेने उपयोग करून उद्याने, रस्त्याकडील जागा आणि सार्वजनिक स्थळांचे सुशोभीकरण केले आहे. त्यांच्या मेहनतीमुळे शहरात सौंदर्याची नवी झळक निर्माण झाली (Pimpri Chinchwad beautification)आहे.
या उपक्रमासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त व आरोग्य विभाग प्रमुख डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आरोग्य अधिकारी राजेश भाट, सुधीर वाघमारे, श्रीराम गायकवाड, मुख्य आरोग्य निरीक्षक अतुल सोनवणे, आरोग्य निरीक्षक रूपाली साळवे, मुकेश जगताप आणि विकास शिरवाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
टाकाऊ वस्तूंचा सर्जनशील वापर केल्यास सुंदर परिवर्तन घडवता येते हे आरोग्य विभागाने या उपक्रमातून दाखवून दिले आहे. नागरिकांकडूनही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहरात ‘स्वच्छतेतून सौंदर्य’ हा सकारात्मक बदल (Pimpri Chinchwad beautification )दिसून येत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची ही कलात्मक मोहीम इतर शहरांसाठीही प्रेरणादायी ठरत असून पुढील काळात अशाच अनेक सुशोभीकरण प्रकल्पांची योजना ( Pimpri Chinchwad beautification) राबवण्यात येणार आहे.
– डॉ. प्रदीप ठेंगल, उप आयुक्त, आरोग्य विभाग
Nigdi Mukai Kivle Brt:निगडी ते मुकाई चौक-किवळे बीआरटी मार्गावर बससेवा सुरू
प्रतिनिधी :पिंपरी-निगडी-मुकाई चौक, किवळे परिसर ते वाघोली दरम्यान सुमारे 32 किलोमीटरच्या ‘फास्ट ट्रॅक कॉरिडॉर’ विकसित करण्याचे नियोजन सुरू आहे. या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमपीएमएल यांच्या माध्यमातून निगडी ते मुकाई चौक-किवळे बीआरटी कॉरिडॉरवर बससेवा (Nigdi Mukai Kivle Brt) सुरू करण्यात आली आहे आमदार शंकर जगताप यांच्या प्रयत्नाने ही सेवा सुरु झाली आहे.
निगडी भक्तीशक्ती चौकापासून ट्रान्सपोर्ट नगर मार्गे मुकाई चौकपर्यंतच्या या नव्या मार्गामुळे नागरिकांना जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. आगामी काळात हा परिसर “मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब” म्हणून विकसित करणार असल्याचा विश्वासही त्यांनी (Nigdi Mukai Kivle Brt) व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड परिसर प्रचंड वेगाने वाढत असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी आमदार शंकर जगताप सतत प्रयत्न करत आहेत. वेळोवेळी प्रशासनाला सूचना देऊन अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. वाघोली, औंध, हिंजवडी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आयटी उद्योग असल्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्याचे नियोजन सुरू (Nigdi Mukai Kivle Brt) आहे.
या नव्या बीआरटी मार्गावरून विविध बस सेवा चालवल्या जातील:
-
निगडी ते आकुर्डी स्टेशन (303)
-
निगडी ते गहुंजे (303A)
-
निगडी ते पिंपरी गुरव (319)
-
निगडी ते हिंजवडी फेज 3 (375)
-
निगडी ते मुकाई चौक (365)
-
भोसरी ते मुकाई चौक (367)
मुकाई चौक ते भक्तीशक्ती बीआरटी रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याने किवळे ते लोहगाव विमानतळ, किवळे ते स्वारगेट, किवळे ते आळंदी, किवळे ते चाकण एमआयडीसी, देहूरोड ते पिंपरीगाव, तसेच सकाळ-सायंकाळ किवळे ते हिंजवडी फेज-3 मार्गावर जास्तीत जास्त बसेस चालवण्याचे निर्देश पीएमपीएमएल (Nigdi Mukai Kivle Brt)प्रशासनाला देण्यात आले आहेत.
मुकाई चौक-किवळे हा मुंबई-बंगळुरू बायपासवरील पिंपरी-चिंचवड शहराचा महत्त्वाचा प्रवेशद्वार मानला जातो. मुंबईहून येणाऱ्या एसटी तसेच खाजगी प्रवासी वाहनांचा येथे नियमित थांबा असतो. त्यामुळे शहराच्या अंतर्गत भागात जाणाऱ्या प्रवाशांना या नव्या बससेवेचा मोठा लाभ होणार आहे. इस्कॉन रावेत, निगडी, आकुर्डी, भोसरी आदी परिसरातील नागरिकांना आता अधिक सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध होणार (Nigdi Mukai Kivle Brt) आहेत.
निगडी ते मुकाई चौक-किवळे बीआरटी मार्गावर समर्पित बस लेन असल्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवास सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सुरुवातीला या मार्गावर 16 बसेस चालवल्या जातील, आणि प्रवासीसंख्या वाढल्यास फेऱ्यांची संख्या वाढवण्याची तयारी पीएमपीएमएलने दर्शवली आहे. प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत की, बीआरटी लेनमध्ये खाजगी गाड्यांची घुसखोरी होऊ नये, तसेच प्रवाशांसाठी सुरक्षित आणि वेगवान सेवा सुनिश्चित केली (Nigdi Mukai Kivle Brt) जावी.
भविष्यात मुकाई चौक-किवळे परिसर मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित होणार आहे, तसेच मुकाई चौक ते वाघोली दरम्यान सुमारे 32 किलोमीटरचा “फास्ट ट्रॅक कॉरिडॉर” तयार करण्याचे नियोजन सुरू आहे.
– शंकर जगताप, आमदार, भाजपा पिंपरी-चिंचवड (Nigdi Mukai Kivle Brt) शहर
