प्रतिनिधी: भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भोसरी परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांच्या संकल्पनेतून, भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रथमच बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘जाणता राजा’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य प्रयोग ६ आणि ७ डिसेंबर रोजी सादर होणार(Janta Raja )आहे.
मनोरंजन
Taras Kivale Event:किवळे येथे राजेंद्र तरस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रम
प्रतिनिधी :शिवसेना युवा नेते राजेंद्र तरस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र. १६ मधील किवळे, रावेत, मामुर्डी, साईनगर, विकास नगर, गुरुद्वारा आणि वाल्हेकरवाडी परिसरातील महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर खेळ व पैठणीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रथम क्रमांकाच्या विजेत्या महिलेला थेट फोर व्हीलर कार बक्षीस म्हणून देण्यात येणार (Taras Kivale Event)आहे.
हा विशेष सन्मान सोहळा शनिवार, २९ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता मुकाई चौक, किवळे गुप्ता मैदान येथे होणार आहे. युवानेते राजेंद्र बाळासाहेब तरस यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात येत असून ऐश्वर्या राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनतर्फे कार्यक्रमाचे आयोजन (Taras Kivale Event) केले आहे.
महिलांसाठी विविध आकर्षक बक्षिसांची सोय करण्यात आली आहे. पहिला क्रमांक मिळवणाऱ्या महिलेला फोर व्हीलर कार, तर दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला ऍक्टिवा दुचाकी प्रदान केली जाणार आहे. याशिवाय एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, शिलाई मशीन, कुलर, ओटीजी, इलेक्ट्रिक किटली, डिनर सेट आणि इतर अनेक घरगुती वस्तूंचा समावेश असलेली बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच २० लकी ड्रॉ बक्षिसांचाही कार्यक्रमात(Taras Kivale Event) समावेश आहे.
Musical Event:सुमधुर गाण्यांची रंगलेली मैफल | “ना सांगताच आज हे कळे मला” सांगीतिक कार्यक्रम
प्रतिनिधी – विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत “ना सांगताच आज हे कळे मला…” या मराठी–हिंदी चित्रपटगीतांच्या निरुपम आणि नि:शुल्क दृक्–श्राव्य मैफलीने गदिमा नाट्यगृहात रसिकांना मंत्रमुग्ध केले.निगडी प्राधिकरण येथील गदिमा नाट्यगृहात गुरुवारी झालेल्या या खास सांगीतिक कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद (Musical Event)दिला.
कार्यक्रमाला दिशा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, साहित्यिक राज अहिरराव, मल्लिकार्जुन इंगळे, विलास गादडे, अॅड. स्मिता शेटे, उषा शेटे, सार्थक भिंगारे, साक्षी भिंगारे, साहिल कांबळे, अनिल घाडगे, राजू भिंगारे, सुनीता भिंगारे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची (Musical Event)उपस्थिती लाभली.
वैविध्यपूर्ण गीतांची श्रवणीय मेजवानी
नंदकुमार कांबळे, विनायक कदम, सुचिता शेटे, डॉ. आरोही पाटे, डॉ. संदीप गायकवाड, अतिथी गायिका ललिता जगदाळे, सतीश कापडी, अरुण सरमाने, नेहा दंडवते आणि विलास खरे या गायक–कलाकारांनी कृष्णधवल काळातील गीतांपासून २००० च्या दशकातील गाण्यांपर्यंत वैविध्यपूर्ण सादरीकरण करून(Musical Event) रसिकांची मने जिंकली.
प्रत्येक गीतासोबत त्या गीताच्या निर्मितीचा रोचक इतिहास आणि संबंधित चित्रपटातील दृश्ये प्रदर्शित केल्यामुळे रसिकांना स्मरणरंजनाचा अनोखा अनुभव (Musical Event) मिळाला.
लक्षवेधी सादरीकरणे
सून साईबा सून…’, ‘फकिरा चल चला चल’, ‘तूने ओ रंगीले कैसे जादू किया’, ‘झुमका गिरा रे’, ‘यह काली काली आंखें’ अशी लोकप्रिय एकल गीते तसेच‘आके तेरी बांहो में’, ‘तू चीज बड़ी है मस्त मस्त’, ‘दिल हूं हूं करे’, ‘तुमको पिया दिल दिया’, ‘अच्छा जी मैं हारी’ अशी युगुल–द्वंद्व गीते प्रेक्षकांच्या मोठ्या दादीत (Musical Event)सादर करण्यात आली.
बालकलाकार सिया आणि तिचे वडील डॉ. संदीप गायकवाड यांनी सादर केलेले “अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना” हे गीत विशेष दाद मिळवणारे (Musical Event)ठरले.
कार्यक्रमाचा उत्कर्षबिंदू)
कार्यक्रमाच्या शीर्षकगीताचे “ना सांगताच आज हे कळे मला” या गीताचे सादरीकरण रसिकांना भावले.
कार्यक्रमाचा समारोप “ऐसा पहली बार हुआ है सत्रह–अठरा सालों में…” या धमाल गीताने करण्यात आला.या मैफलीचे संयोजन विनायक कदम आणि नंदकुमार कांबळे यांनी केले. सचिन शेटे यांनी विशेष साहाय्य केले. ध्वनिसंयोजन शैलेश घावटे, तांत्रिक सहाय्य व छायाचित्रण विक्रम क्रिएशन यांनी केले. निवेदन सीमा (Musical Event) गांधी यांनी केले.

YCM Sammelan:४१ वा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह अंबाजोगाई येथे उत्साहात; तीन दिवसीय वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल
अंबाजोगाई :यशवंतराव चव्हाण स्मृती समितीतर्फे आयोजित करण्यात येणारा ४१ वा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह यंदा २५, २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयात भव्यदिव्य कार्यक्रमांसह पार पडणार आहे. साहित्य, कला, संगीत, कृषी, बालरंजन, कवी संमेलने आणि पुरस्कार सोहळ्याने समृद्ध असा तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव साजरा होणार असल्याची माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी (YCM Sammelan) दिली.
उद्घाटन व कवी संमेलन – २५ नोव्हेंबर
मंगळवारी सायं. ५.३० वाजता या समारोहाचे उद्घाटन नांदेडचे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते(YCM Sammelan )होणार आहे.
रात्री ८.३० वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. पी. विठ्ठल (नांदेड) असतील.
कवी अविनाश भारती सूत्रसंचालन करणार असून शरद धनगर, पुनीत मातकर, अनंत राऊत, डी. के. शेख, लता ऐवळे कदम, अविनाश काठवटे, गुंजन पाटील, गजानन मते, सुनील उन्हाळे, सय्यद चांद तरोडकर आणि आत्माराम जाधव यांचा सहभाग राहणार आहे.
चित्रकला स्पर्धा, बालआनंद मेळावा आणि ‘सोबतीचा करार’ – २६ नोव्हेंबर
बुधवारी सकाळी ८ वाजता ८ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा होणार आहे.
सकाळी १०.३० वाजता बाल आनंद मेळावा पार पडेल. विजेत्यांना साहित्यिक विठ्ठल जाधव यांच्या उपस्थितीत बक्षिसे प्रदान केली जातील. चित्रकार त्र्यंबक पोखरकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
सायंकाळी ८ वाजता कवी वैभव जोशी यांच्या रचनांवर आधारित “सोबतीचा करार” या संगीत मैफिलीचे आयोजन आहे.
गायक दत्तप्रसाद रानडे यांना संगीतकार आशिष मुजुमदार, निनाद सोलापूरकर, समीर शिवगार आणि आमोद कुलकर्णी यांची साथसंगत लाभणार आहे.
शेतकरी परिषद आणि समारोप – २७ नोव्हेंबर
गुरुवारी सकाळी १०.३० वाजता शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण “यशवंतराव चव्हाण यांचे कृषी–औद्योगिक धोरण आणि वर्तमान शेती” या विषयावर मार्गदर्शन करतील.
अध्यक्षस्थानी प्रयोगशील महिला शेतकरी विजया गंगाधर घुले उपस्थित राहणार आहेत.
सायं. ५.३० वाजता समारोप व यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार वितरण सोहळा डॉ. कमलताई गवई यांच्या हस्ते पार पडणार आहे.
स्मृती पुरस्कार विजेते
कृषी – विजया घुले (केळसांगवी)
साहित्य – केशव वसेकर (परभणी)
संगीत – पं. मुकेश जाधव (पुणे)
क्रीडा – युवा गौरव – कु. प्रियंका इंगळे (भारतीय महिला खो-खो संघ कर्णधार)
पुरस्कारात शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पहार आणि रु. ५०००/- रोख रक्कम असे स्वरूप असेल.
समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक भगवानराव शिंदे (बप्पा) यांचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे.
शास्त्रीय संगीत मैफल
रात्री ८.३० वाजता जागतिक ख्यातीचे तबलावादक पं. मुकेश जाधव यांचे तबला सोलो वादन होईल. त्यांना संवादिनीवर अभिषेक शिनकर साथ करतील.
यानंतर आंतरराष्ट्रीय गायक कृष्णा बोंगाणे यांची मैफल रंगणार असून त्यांना तबल्यावर आशय कुलकर्णी आणि संवादिनीवर अभिषेक शिनकर साथ करतील.
ग्रंथ प्रदर्शन व कला दालने
तिन्ही दिवस ग्रंथ विक्री-प्रदर्शन, चित्रकला व हस्तकला दालने भरवली जाणार आहेत.
समितीतर्फे सर्व नागरिक, विद्यार्थी आणि रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले(YCM Sammelan )आहे.
Pandharpur Yatra:यमुनानगर–निगडीतील भाविकांची पंढरपूर यात्रा उत्साहात पूर्ण
यमुनानगर, निगडी —विठ्ठल–रुक्मिणी मंदिर, मुक्ताई गार्डन, यमुनानगर संस्थेचे अध्यक्ष श्री. अंकुश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हरिपाठ आणि काकड आरतीला नियमित हजेरी लावणाऱ्या भाविकांसाठी एक दिवसीय पंढरपूर यात्रेचे आयोजन करण्यात (Pandharpur Yatra) आले.
१९ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी शंभर भाविकांचा लक्झरी बसमधून यात्रेला शुभारंभ झाला. भिगवण येथे अल्पोपहार आणि चहापानानंतर बस पुढे पंढरपूरकडे रवाना झाली. दुपारी बारा वाजता यात्रेकरू पंढरपूरला (Pandharpur Yatra) पोहोचले.
गोपाळपुरा आणि विष्णुपद मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण नामदेव पायरीवर एकत्र आले. सुयोग्य नियोजनामुळे सर्व भाविकांना ऑनलाइन पास सहज उपलब्ध झाले. अवघ्या तासाभरात विठ्ठल–रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाचा लाभ घेत भाविकांची मनं धन्य झाली. दर्शनानंतर सर्वांनी पुरणपोळीच्या सुग्रास जेवणाचा आस्वाद घेतला व आपापले मनोगत व्यक्त(Pandharpur Yatra) केले.
यमुना नगरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या सहलीत विशेष आनंद लुटला. ऑनलाइन पास, आरामदायी बस, उत्तम नाश्ता आणि महाप्रसादाची व्यवस्था पाहता, सर्वांनी विठ्ठल–रुक्मिणी मंदिर सेवा संस्थेच्या ट्रस्टींना अभिनंदन व (Pandharpur Yatra) आशीर्वाद दिले.
बसप्रवासात हरिपाठ, सुगम संगीत, भेंड्या, कविता वाचन, नाट्यछटा, पोवाडे आणि लोकप्रिय गाण्यांवर नाचण्याचा आनंद घेतल्याने वातावरण अधिक रंगतदार झाले. यात्रेला सुखद बनविल्याबद्दल भाविकांनी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अंकुश जगदाळे, यमुना नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. गजानन ढमाले, श्री. आप्पा काळोखे, श्री. मच्छिंद्र महाकाळ, श्री. अनंत महाराज मोरे, श्री. मंगल महाराज जगताप, श्री. गणेश इंगवले, सौ. नयना पारखे, सौ. संगीता टुपके आणि शशिकला उभे यांचे विशेष (Pandharpur Yatra) आभार मानले.
Tribute To Dharmendra:धर्मेंद्र : रुपेरी पडद्याचा ही-मॅन | श्रद्धांजली लेख
“मै जट यमला पगला दिवाना…”ही-मॅन धर्मेंद्र : एक काळ, एक अस्मिता, एक सुवर्णस्वप्न**
धर्मेंद्र यांच्या १९६० ते २०२५ या विस्तीर्ण, भव्य आणि तेजस्वी चित्रपट कारकिर्दीचा आढावा घ्यायचा म्हटलं, तर सुरुवात नक्की कुठून करावी—याच संभ्रमात मी आजही हरवून जातो. कारण धर्मेंद्र हे फक्त अभिनेता नव्हते; ते एक युग होते, एक स्वप्न होते, आणि लाखो रसिकांच्या हृदयात कोरलेला एक (Tribute To Dharmendra) भावपूर्ण ठसा होते.
गोरा-पान, उंचापुरा, पिळदार देहयष्टी… साठच्या दशकात रुपेरी पडद्यावर अवतरलेला हा देखणा नायक उगवता उगवता, प्रेक्षकांच्या मनाचा धनी (Tribute To Dharmendra)झाला.
“दिल भी तेरा हम भी तेरे…” म्हणत पदार्पण केलेल्या धर्मेंद्रने खरंच प्रेक्षकांना जिंकून घेतलं—हृदयापासून.
भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास जर कधी लिहिला गेला, तर त्यात ‘धर्मेंद्र’ हे प्रकरण विसरून चालणार नाही. अॅक्शन, रोमॅन्स, भावनांचा उन्मेष आणि प्रामाणिकपणाने भारलेला अभिनय—धर्मेंद्र हे सगळ्यांचे सुंदर (Tribute To Dharmendra)मिश्रण होते.
दोन बुक्कीत खलनायकाला आडवे पाडणारा…
टकलू शेट्टीवर प्रहार करून त्याला गारद करणारा…
वाघाच्या जबड्यात हात घालणारा निर्भय नायक…
आणि अन्यायाविरुद्ध ज्वालाग्राही चीड बाळगणारा राका!
प्रत्येक रुपात धर्मेंद्र उठून दिसत.
१९६० च्या दशकातील तरुण मुलींच्या स्वप्नात दररोज विहरणारा हा राजकुमार जेव्हा
“कलियों ने घूंघट खोले…”
असं गुणगुणत पडद्यावर दिसे, तेव्हा सिनेमागृहात श्वास रोखला जाई.
त्या काळात राज कपूर, दिलीप कुमार, देवानंद, राजेंद्र कुमार अशा दिग्गजांचा दबदबा असताना, धर्मेंद्र यांनी कोणाशी स्पर्धा न करता, कोणालाही कमी न लेखता, स्वतःची वेगळी अदाकारी घडवली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक शांत ऊर्जेचा प्रवाह होता—प्रामाणिक, स्वाभिमानी (Tribute To Dharmendra)आणि निर्मळ.
**“आई मिलन की बेला”**पासून सुरू झालेला यशाचा प्रवास **“फूल और पत्थर”**सारख्या महत्त्वाच्या चित्रपटांपर्यंत झेपावला. मीनाकुमारीसोबतचा त्यांचा पडद्यावरील जादुई रसायनशास्त्र चर्चेचा विषय (Tribute To Dharmendra)ठरले.
धर्मेंद्रने अनेक चित्रपट गाण्याविना देखील लक्षात राहतील असे पात्र साकारले. “यादों की बारात”मधील मोठ्या भावाचा त्यांचा भावस्पर्शी अभिनय, प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका क्षणभर चुकवतो.
जितेंद्र, राजेश खन्ना, शशी कपूर, मनोजकुमार यांच्या चित्रपटांची वादळं सुटत असताना देखील, निर्मात्यांनी धर्मेंद्रच्या नावावर अटूट विश्वास ठेवला. कारण ही-मॅन म्हणजे पैसा वसूल!
नंबर वन नसला, तरी कधीच नंबर दोनखाली न उतरणारा हा तेजस्वी नायक.
त्यांची असंख्य गाणी आजही काळाच्या ओघात ताजी आहेत—
“पल-पल दिल के पास…”
“आज मौसम बड़ा बेईमान है…”
“झिलमिल सितारों का आँगन होगा…”
“यकीन कर लो मुझे…”
धर्मेंद्र–हेमामालिनी ही जोडी ७०–७५ या काळात प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत .(Tribute To Dharmendra) होती.
“रेशमी आँखों वाली…” पासून ते
“ओ मेरी महबूबा…”
पर्यंत ही जोडी लोकांच्या स्वप्नात राहिली.
पडद्यावरचा रोमॅन्स वास्तवात बदलला आणि ड्रीमगर्ल अखेर धर्मेंद्रचीच झाली—ही तर खऱ्या अर्थाने “कहानी किस्मत की”.
‘शोले’मधील त्यांचा बेधडक, मोकळा स्वभाव आजही विसरता येत नाही. अमिताभच्या खांद्यावर बसून Mouth Organ वाजवत
“ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे…”
म्हणणारा धर्मेंद्र म्हणजेच भारतीय सिनेमाचा सदाबहार चेहरा.
राजकपूरच्या **“मेरा नाम जोकर”**मध्ये त्यांनी म्हटलेला संवाद आजही स्मरणात रेंगाळतो—
“शो मस्ट गो ऑन.”
सुमारे २५० हून अधिक चित्रपटांतून त्यांनी अॅक्शन, विनोद, करुणा आणि रोमॅन्स—सगळं काही प्रेक्षकांना दिलं.
“कुत्ते कमीने मैं तुझे छोड़ूंगा नहीं!”
हा संवाद ऐकला की प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट (Tribute To Dharmendra)थांबायचा नाही.
धर्मेंद्रची गाणी म्हणजे एक अखंड प्रवाहच—
“आपके हसीन रूख पे…”,
“हमसफर मेरे…”,
“कुछ दिल ने कहा…”,
“क्या नज़ारे क्या सितारे…”,
“कुछ कहता है ये सावन…”
आणि “सत्यकाम”मधील त्यांचा जीवनरस ओतप्रोत गीत—
“बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो…”
हा मंत्र जणू त्यांच्या (Tribute To Dharmendra)व्यक्तिमत्त्वाचाच गाभा होता.
धर्मेंद्र हे नाव घेताच आजही मनात अनेक गीतांची गुंजारव सुरू होतो. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत एक सुनियोजित सच्चेपणा आणि हृदयाला भिडणारी तीव्र (Tribute To Dharmendra)संवेदना असते.
आज ते एक युग म्हणून, एक उज्ज्वल अध्याय म्हणून आणि एक चिरंतन स्मृती म्हणून आपल्यात जिवंत आहेत. अभिनयाची ही आग, हा आविष्कार आणि हा प्रामाणिकपणा—आपल्या सगळ्यांच्या मनात सदैव झळाळत राहो.
लेखन – सुरेश कंक
पिंपरी-चिंचवड मधील साहित्यिक, कवी आणि उत्कट सिनेप्रेमी.

Final Rites:बॉलिवूडचा ही-मॅन धर्मेंद्र यांचे निधन; वयाच्या ८९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास – विलेपार्ले येथे अंत्यसंस्कार
मुंबई,:हिदी चित्रपटसृष्टीतील अजरामर सुपरस्टार, लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि “ही-मॅन” म्हणून विशेष ओळखले जाणारे धर्मेंद्रसिंग देओल यांचे आज वयाच्या ८९व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्य समस्यांशी झुंज देत होते. काही दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी हलवण्यात आले होते; मात्र अखेर त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांनी अखेरचा श्वास ( Final Rites)घेतला.
धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. चाहत्यांसाठी ही एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी ठरली आहे. त्यांचे विलेपार्ले येथील स्मशानभूमीत आज दुपारी कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी देओल परिवारासोबत अनेक नामवंत कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि त्यांच्या चित्रपटसृष्टीतील जिवलग मंडळींनी हजेरी लावून अंतिम श्रद्धांजली( Final Rites) वाहिली.
सहा दशकांचा अविस्मरणीय प्रवास
1960 च्या दशकात आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या धर्मेंद्र यांनी जवळपास सहा दशकांहून अधिक काळ हिंदी सिनेमावर अधिराज्य गाजवले. शोले मधील वीरू, चुपके चुपके मधील विनोदी अभिनय, धरम वीर, सीता और गीता, शराबी, यादों की बारातसारख्या असंख्य चित्रपटांमधील भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स — कोणत्याही शैलीमध्ये सहज रुळणारा अभिनेता म्हणून त्यांची( Final Rites) ख्याती होती.
त्यांच्या दमदार व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना “ही-मॅन ऑफ बॉलिवूड” ही उपाधी मिळाली. स्टंट स्वतः करण्याची धडाडी, संवादफेक, व्यक्तिमत्त्व आणि स्क्रीन प्रेझेन्स यामुळे ते 70–80 च्या दशकातील सर्वात मोठे सुपरस्टार ठरले. त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना पद्मभूषण सन्मानही प्रदान करण्यात( Final Rites) आला होता.
कुटुंबीयांची भावनिक प्रतिक्रिया
धर्मेंद्र यांच्या निधनामुळे देओल परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पत्नी हेमा मालिनी, मुलगे सनी देओल, बॉबी देओल, तर मुली ईशा आणि अहाना देओल यांनी त्यांच्या जाण्याला “कधीही न भरून येणारी पोकळी” असे संबोधले आहे. देओल कुटुंबाचे अनेक नातेवाईक आणि जवळचे मित्र दिवसभर त्यांच्या निवासस्थानी ( Final Rites)दाखल होत होते.
चाहत्यांचा आवडता ‘माणूस’
चाहत्यांनी धर्मेंद्र यांना फक्त अभिनेता म्हणूनच नव्हे तर “माणूस” म्हणूनही जपले. त्यांचा साधेपणा, नम्रता, ग्रामीण मातीचा सुगंध असलेले व्यक्तिमत्त्व आणि सर्वांना जोडून घेण्याची प्रवृत्ती यामुळे ते आजही लोकांच्या हृदयात खास स्थान मिळवून आहेत. सोशल मीडियावर देशभरातून शोकसंदेशांचा महापूर उसळला असून “एक युग संपले” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात पाहायला ( Final Rites)मिळतात.
भारतीय सिनेमाचे एक सुवर्णपान संपले
धर्मेंद्र यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक भव्य, सुवर्ण कालखंड संपल्याची भावना बॉलिवूडमध्ये व्यक्त होत आहे. त्यांच्या मृत्यूमुळे भारतीय सिनेमा एका महान कलाकाराला मुकला आहे. त्यांच्या भूमिका, त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि सिनेमातील अमर योगदान पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ( Final Rites) राहील.
Mauritius Marathi Singer:मॉरिशस मधील मराठी गायकास संस्कृती संवर्धन पुरस्कार*
पिंपरी प्रतिनिधी: कलारंजन प्रतिष्ठानच्या वतीने, मॉरिशसमधील मराठी गायक व विविध संस्थांच्या माध्यमातून मराठी संस्कृती संवर्धनाचे काम करणारे, मॉरिशस नॅशनल टीव्हीचे वरिष्ठ निर्माता अर्जुन पुतलाजी यांना ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. रवींद्र घांगुर्डे यांच्या हस्ते संस्कृती संवर्धन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदारमहाराज देव, कासारवाडी दत्त मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त शिवानंद स्वामीमहाराज, ह. भ. प. रोहिदासमहाराज हांडे यांची विशेष उपस्थिती (Mauritius Marathi Singer) असणार आहे.
सदर कार्यक्रम बुधवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजता चिंचवड येथील मंगलमूर्ती वाड्यात संपन्न होणार आहे. सत्कारानंतर लगेच मॉरिशसमधील कलाकारांचा मराठी भक्तिसंगीताचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले (Mauritius Marathi Singer) यांनी दिली आहे.
Ghorawadeshwar Hyena:गहुंजे स्टेडियमजवळ घोरावडेश्वर डोंगर परिसरात तरसाचे दर्शन
पिंपरी प्रतिनिधी: घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याजवळील जंगल पट्ट्यात, गहुंजे स्टेडियमच्या जवळ बुधवारी (दि. 19) सकाळी तरस दिसल्याची घटना घडली. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या काही नागरिकांना झाडीत हालचाल जाणवल्यानंतर त्यांनी बारकाईने पाहिले असता तरस दिसून आला. काही क्षणांतच तो पुन्हा जंगलात निघून (Ghorawadeshwar Hyena) गेला.
अचानक झालेल्या या दर्शनामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असली, तरी भीतीचे वातावरण पसरू नये म्हणून वनविभागाने तात्काळ माहिती देत नागरिकांना शांत (Ghorawadeshwar Hyena)राहण्याचे आवाहन केले आहे.
वनरक्षक योगेश कोकाटे यांनी सांगितले, “तरस माणसांना कोणताही धोका पोहोचवत नाही. उलट तो परिसरातील सडलेले किंवा मेलेले प्राणी खाऊन नैसर्गिक स्वच्छता राखण्याचे काम करतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून (Ghorawadeshwar Hyena) जाऊ नये.”
वन विभागाच्या माहितीनुसार, तरस सहसा शांत आणि निर्जन भाग पसंत करतो. तरीही खबरदारी म्हणून रात्रीच्या वेळी जंगल पट्ट्यात एकटे फिरू नये आणि जनावरे सुरक्षित अंतरावर बांधावीत, अशी सूचना देण्यात आली (Ghorawadeshwar Hyena) आहे.
घोरावडेश्वर डोंगर परिसर जैवविविधतेने समृद्ध असून येथे तरसाबरोबरच मोर, कोल्हे, ससे आणि विविध वन्यजीव आढळतात. तरसाचे दर्शन हे पर्यावरणीय संतुलनासाठी सकारात्मक संकेत असल्याचे तज्ज्ञांचे मत (Ghorawadeshwar Hyena) आहे.
Majha Pimpri Chinchwad E-paper Launch:आईच्या हस्ते ‘माझं पिंपरी चिंचवड’ ई-पेपरचे लोकार्पण — निगडीतील साहित्यिक विवेक कुलकर्णींचा हृदयस्पर्शी सोहळा
निगडी: जीवनातल्या सर्वात मोठ्या आनंदांपैकी एक म्हणजे आपण उभारलेल्या कार्याचा प्रथम प्रवास आपल्या आईच्या आशीर्वादाने सुरू होणे. हाच भावनिक क्षण अनुभवत निगडीतील कवी, साहित्यिक आणि मुक्त पत्रकार विवेक कुलकर्णी यांनी आपल्या नवीन ‘माझं पिंपरी चिंचवड’ या ई-पेपर आणि वेब पोर्टलचे लोकार्पण आपल्या मातोश्री सुधा दिगंबर कुलकर्णी यांच्या शुभहस्ते केले. या अनोख्या आणि मनाला स्पर्शून जाणाऱ्या सोहळ्याची साक्ष अनेक मान्यवरांनी आणि स्नेहजनांनी घेतली.
विवेक कुलकर्णी हे गेली १८ वर्षांहून अधिक काळ निगडीमध्ये वास्तव्यास राहून साहित्य, कविता आणि मुक्त पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. समाजातील चांगल्या–वाईट घटनांना शब्दबद्ध करत, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत त्यांनी या क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या लेखणीतील संवेदनशीलता आणि सामाजिक भान यामुळे वाचकांमध्ये त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
समाजभानातून जन्मलेला ई-पेपर
“पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याची कला नसून समाजाबद्दलची जबाबदारी आहे,” असा ठाम विश्वास बाळगणाऱ्या कुलकर्णी यांनी ‘माझं पिंपरी चिंचवड’ या ई-पेपरची सुरुवात लोकहित आणि शहराच्या विकासदृष्टीने केली आहे.
राजकारण, साहित्य, कला, क्रीडा, अर्थकारण, शिक्षण, संस्कृती… समाजरचनेचे प्रत्येक घटक ज्या कागदात, ज्या माध्यमात प्रतिबिंबित होतात अशा सर्व अंगांनी वाचकांना समृद्ध करण्याचा त्यांनी या पोर्टलच्या माध्यमातून संकल्प केला आहे.
लोकार्पणाच्या वेळी बोलताना कुलकर्णी म्हणाले,
“माझ्या लेखनाचा, माझ्या प्रवासाचा पाया आईनेच घातला. तिचा आशीर्वाद घेऊन या माध्यमाची सुरुवात करणे माझ्यासाठी आयुष्यभराची प्रेरणा आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सत्य, सार आणि संवेदनशीलतेने पोहचणे हा ‘माझं पिंपरी चिंचवड’चा उद्देश असेल.”
या प्रसंगी उपस्थित कुटुंबीय व मित्रांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक करत नव्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निगडी परिसरातील साहित्यप्रेमी आणि पत्रकारितेशी निगडित वर्तुळात या ई-पेपरच्या शुभारंभाचे विशेष स्वागत करण्यात आले आहे.
