प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महापालिकेने (PCMC Election) दुरुस्तीसह जाहीर केलेल्या सुधारित आरक्षण सोडतीला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, यादी प्रसिद्ध झाल्यानंतर केवळ तीन दिवसांत तब्बल २२ हरकती दाखल झाल्या आहेत. सुधारित आरक्षण यादी सोमवारी (दि. १७) जाहीर करण्यात आली.
महापालिकेने यापूर्वी ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत घोषित केली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार सुधारित यादी जारी करण्यात आली. पहिल्या दिवशी (सोमवार) कोणतीही हरकत प्राप्त झाली नव्हती; मात्र मंगळवारी चार आणि बुधवारी तब्बल १८ हरकती निवडणूक विभागाला प्राप्त झाल्या.
प्रभाग ३० वर सर्वाधिक हरकती (PCMC Election)
सर्वांत जास्त म्हणजे २१ हरकती दापोडी–फुगेवाडी–कासारवाडी प्रभाग क्रमांक ३० संदर्भात दाखल झाल्या आहेत. या प्रभागातील ओबीसी आरक्षण ‘ओबीसी महिला’ श्रेणीत बदलल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून मोठ्या प्रमाणात हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. याशिवाय शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी प्रभाग क्रमांक २४ बाबत एक हरकत नोंदवली आहे.
हरकतींसाठी अंतिम तारीख – २४ नोव्हेंबर (PCMC Election)
आरक्षणाबाबतच्या हरकती आणि सूचना २४ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारल्या जाणार असून, नागरिकांना महापालिकेच्या तळमजल्यावरील निवडणूक विभागात तसेच सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांत हरकती दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
https://chat.whatsapp.com/IKyA09noAjU4kJjQm9a6uT?mode=hqrt3
आरक्षणाबाबत वाढत्या हरकतींमुळे आगामी दिवसांत या विषयावरची चर्चा आणखी गहिऱ्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
—

इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ फॅसिलिटेशन (IAF) तर्फे लवळे येथील सांदिपनी होमेटेल येथे आयोजित परिषदेत पिंपरी-चिंचवड महापालिका समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘सक्षमा’ प्रकल्पाला विशेष दाद मिळाली. या प्रकल्पांतर्गत कार्यरत महिला बचत गटांनी तयार केलेल्या घरगुती आणि हाताने बनवलेल्या वस्तूंना विदेशी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात खरेदी (Sakshama PCMC Iaf )केली.