प्रतिनिधी :तळेगाव दाभाडे परिसरात ‘माझ्या बायकोकडे का पाहिलंस?’ असा सवाल करत एका व्यक्तीने दुसऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. याबाबत ४७ वर्षीय व्यक्तीने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी ४५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मजूर कामगारांची चौकशी करून घरी परतत असताना आरोपीने त्यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ केली. ‘माझ्या पत्नीवर नजर का टाकली?’ असे म्हणत त्याने फिर्यादीला ढकलून खाली पाडले. त्यानंतर घरातून धारदार शस्त्र आणून फिर्यादीच्या डोक्यावर दोन वेळा वार केला. या प्रकरणाचा तपास तळेगाव दाभाडे पोलिसांनी सुरू केला आहे.
