प्रतिनिधी :पिंपरी ते निगडी दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे या मार्गावरील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, याचा फटका दररोज प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि नागरिकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर युवा नेते अभिषेक बारणे यांनी महामेट्रो आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे तातडीने रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी केली (Pimpri Nigdi Metro) आहे.
मेट्रोच्या खांबांचे आणि इतर कामे सुरू असताना अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही संबंधित ठिकाणी डांबरीकरण किंवा योग्य दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी, संपूर्ण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असल्याचा आरोप बारणे यांनी केला (Pimpri Nigdi Metro)आहे.
या खराब रस्त्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडी, धुळीचा त्रास आणि अपघातांच्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला (Pimpri Nigdi Metro) आहे.
अभिषेक बारणे यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, “येत्या काही दिवसांत रस्त्यांची तातडीने डागडुजी व दुरुस्ती करण्यात आली नाही, तर नागरिकांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात (Pimpri Nigdi Metro) येईल.”
“मेट्रो प्रकल्प हा शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा असला, तरी त्या कामामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांना होणारा त्रास प्रशासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी स्पष्ट (Pimpri Nigdi Metro) केले.


