Home क्रीडा Junior Women National:झारखंड-हरियाणा आमनेसामने; कनिष्ठ महिला हॉकी राष्ट्रीय स्पर्धेचा महामुकाबला

Junior Women National:झारखंड-हरियाणा आमनेसामने; कनिष्ठ महिला हॉकी राष्ट्रीय स्पर्धेचा महामुकाबला

१६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदासाठी झारखंड आणि हरियाणा आमनेसामने. २३ ऑगस्टला पिंपरीतील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर अंतिम सामना.

by Admin
Spread the love

(पिंपरी, २२ ऑगस्ट) : १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२६च्या जेतेपदासाठी हॉकी झारखंड आणि हॉकी हरियाणा आमनेसामने येणार आहेत. पिंपरी-चिंचवडमधील नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर रविवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजता या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार (Junior Women National) आहे.

 

१२ ते २३ ऑगस्टदरम्यान सुरू असलेल्या या स्पर्धेत देशभरातील अव्वल कनिष्ठ महिला संघांनी दमदार कामगिरी केली. उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीतील चुरशीच्या लढतींनंतर झारखंड आणि हरियाणाने अंतिम फेरी गाठली असून, दोन्ही संघ अद्याप अपराजित (Junior Women National) आहेत.

 

कर्णधार राजनी केरकेट्टा आणि प्रशिक्षक विकास पंत यांच्या नेतृत्वाखालील झारखंडने स्पर्धेत संयमी, शिस्तबद्ध आणि दबावाच्या परिस्थितीत प्रभावी खेळ केला आहे. झारखंडने हॉकी चंदीगडचा ६-० असा धुव्वा उडवत विजयी सुरुवात केली. त्यानंतर हॉकी पंजाबवर ३-१ असा विजय (Junior Women National) मिळवला.

 

उपांत्यपूर्व फेरीत हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशाविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत राहिल्यानंतर झारखंडने शूटआउटमध्ये ४-३ असा विजय मिळवला. उपांत्य फेरीत हॉकी मध्य प्रदेशविरुद्धही सामना १-१ असा बरोबरीत सुटला. मात्र शूटआउटमध्ये झारखंडने २-१ असा विजय मिळवत अंतिम फेरीतील स्थान निश्चित(Junior Women National) केले.

 

दुसरीकडे, कर्णधार शशी खासा आणि प्रशिक्षक आझाद सिंग मलिक यांच्या नेतृत्वाखालील हरियाणाने स्पर्धेत गोलधडाका केला आहे. हरियाणाने हॉकी बंगालचा १०-१ असा मोठा पराभव करत मोहिमेला सुरुवात केली. त्यानंतर हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशाचा ३-०, उपांत्यपूर्व फेरीत हॉकी चंदीगडचा ३-१ आणि उपांत्य फेरीत छत्तीसगड हॉकीचा तब्बल ८-० असा पराभव(Junior Women National) केला.

 

चार सामन्यांत तब्बल २४ गोल करताना केवळ दोन गोल स्वीकारणाऱ्या हरियाणाची आक्रमण आणि बचावफळी दोन्ही भक्कम दिसत आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यात हरियाणाच्या आक्रमक हॉकीला झारखंडच्या संयमी आणि लढाऊ खेळाचे आव्हान असणार (Junior Women National) आहे.

 

सलग दोन बाद फेरीतील सामने शूटआउटमध्ये जिंकण्याची कामगिरी झारखंडसाठी आत्मविश्वास वाढवणारी ठरली आहे. दुसरीकडे, मोठ्या फरकाने विजय मिळवत अंतिम फेरी गाठलेल्या हरियाणाचा आत्मविश्वासही उंचावलेला आहे. त्यामुळे दोन्ही अपराजित संघांमधील ही लढत अत्यंत चुरशीची होण्याची अपेक्षा(Junior Women National) आहे.

 

राजनी केरकेट्टा आणि शशी खासा या दोन्ही कर्णधारांवर आपल्या संघाला राष्ट्रीय विजेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी असेल. त्यामुळे रविवारी पिंपरीत होणाऱ्या या महामुकाबल्याकडे हॉकीप्रेमींचे लक्ष लागले(Junior Women National) आहे.

 

ही स्पर्धा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने हॉकी महाराष्ट्रातर्फे आणि हॉकी इंडियाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली (Junior Women National) आहे.

ग्रँड फायनल

हॉकी झारखंड विरुद्ध हॉकी हरियाणा

दिनांक : २३ ऑगस्ट २०२६

वेळ : सायंकाळी ६ वाजता

स्थळ : मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी, पुणे

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00