Home शिक्षण Dr. D. Y. Patil Dental College : डी. वाय. पाटीलमध्ये अत्याधुनिक जिनॉमिक्स लॅब सुरू

Dr. D. Y. Patil Dental College : डी. वाय. पाटीलमध्ये अत्याधुनिक जिनॉमिक्स लॅब सुरू

पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील दंत महाविद्यालयात अत्याधुनिक जिनॉमिक्स अँड प्रिसिजन मेडिसिन लॅब सुरू. आजारांचे अचूक निदान, संशोधन आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी ): आरोग्य सेवा आणि वैद्यकीय संशोधन क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल टाकत डॉ. डी. वाय. पाटील दंत महाविद्यालय व रुग्णालय, पिंपरी येथे अत्याधुनिक ‘जिनॉमिक्स अँड प्रिसिजन मेडिसिन प्रयोगशाळे’चे उद्घाटन मंगळवारी (४ ऑगस्ट) करण्यात आले. वैयक्तिक उपचारपद्धती, आजारांचे अचूक निदान आणि जागतिक दर्जाच्या संशोधनाला चालना देणारे हे केंद्र ठरणार आहे.

उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. (सौ.) भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलगुरू डॉ. (सौ.) स्मिता जाधव यांच्यासह अमेरिकेतील एमोरी विद्यापीठाचे मानद प्राध्यापक डॉ. मिर्को पायर्डिनी, डॉ. डीआना कुल्पा आणि डॉ. विजयकुमार वेलू उपस्थित होते.

ही प्रयोगशाळा जिनॉमिक्स आणि प्रिसिजन मेडिसिन या आधुनिक वैद्यकीय संकल्पनांवर आधारित असून, डीएनए आणि जनुकीय माहितीच्या अभ्यासातून प्रत्येक रुग्णासाठी अधिक प्रभावी उपचारपद्धती निश्चित करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मधुमेह, हृदयविकार, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचे अधिक अचूक निदान आणि परिणामकारक उपचार शक्य होणार आहेत.

या सुविधेचा लाभ वैद्यकीय, दंत, नर्सिंग, फिजिओथेरपी आणि बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना होणार असून, त्यांना मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोइन्फॉर्मेटिक्स, इम्युनोलॉजी आणि मायक्रोबायोम विज्ञानातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच आंतरशाखीय संशोधन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन संधींनाही चालना मिळणार आहे.

भारतीय लोकसंख्येसाठी स्वतंत्र जीनोमिक डेटाबेस विकसित करण्याचे उद्दिष्ट या प्रयोगशाळेने ठेवले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) सहाय्याने डीएनए विश्लेषण, गंभीर आजारांचे लवकर निदान तसेच तोंडाच्या आरोग्याचा इतर आजारांशी असलेला संबंध यावरही संशोधन केले जाणार आहे.

या प्रकल्पासाठी विद्यापीठाने सुमारे ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली असून, रिअल-टाइम पीसीआर प्रणाली, बायोसेफ्टी सुविधा आणि अत्याधुनिक बायोइन्फॉर्मेटिक्स साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भविष्यात नेक्स्ट-जनरेशन सिक्वेन्सिंग (NGS) तंत्रज्ञानाचा विस्तार करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने संशोधन अधिक व्यापक करण्याची योजना आहे.

या प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळण्याबरोबरच भविष्यात सर्वसामान्य रुग्णांसाठी अधिक अचूक, वैयक्तिक आणि परवडणाऱ्या उपचारपद्धती विकसित करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00