Home प्रेरणा / यशकथा PCMC Morwadi ITI:अंतिम निकालापूर्वीच मोरवाडी आयटीआयच्या नऊ विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिपची संधी

PCMC Morwadi ITI:अंतिम निकालापूर्वीच मोरवाडी आयटीआयच्या नऊ विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिपची संधी

पीएमटी मशीन्स लिमिटेडमध्ये टर्नर व इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांची निवड

by Admin
Spread the love

(पिंपरी, दि. २९ ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मोरवाडी येथील टर्नर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांना अंतिम परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच अप्रेंटिसशिपची संधी मिळाली आहे. पीएमटी मशीन्स लिमिटेड, पिंपरी यांच्या सहकार्याने संस्थेत घेण्यात आलेल्या मुलाखतीत टर्नर ट्रेडचे सहा आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडचे तीन अशा एकूण नऊ प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात आली.

 

पीएमटी मशीन्सच्या वरिष्ठ एचआर मॅनेजर चैत्राली पाटील आणि एचआर मॅनेजर अजय शर्मा यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेत कंपनीची माहिती दिली. निवड झालेल्या अप्रेंटिसना एका वर्षासाठी दरमहा ₹२०,४०० इतके विद्यावेतन, कॅन्टीन सुविधा तसेच पुढील उच्च शिक्षणासाठी पदविका अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. कामगिरीच्या आधारे भविष्यात कायमस्वरूपी रोजगाराची संधीही मिळू शकते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी प्रशिक्षणार्थ्यांना तांत्रिक कौशल्याच्या बळावर करिअर घडविण्याचे आवाहन केले. अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेत विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गटनिदेशक रवी ओव्हाळ, शर्मिला काराबळे तसेच निदेशक एन. के. लांडगे, विशाल रेंगडे, सीमा जाधव आणि कार्यालयीन कर्मचारी अभिनव हातगांवकर यांनी सहकार्य केले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00