Home क्रीडा Mayor Cup Carrom Tournament :महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते १९ व्या महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचा शुभारंभ

Mayor Cup Carrom Tournament :महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते १९ व्या महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचा शुभारंभ

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते १९ व्या महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचा शुभारंभ,कै. सोपानराव भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित स्पर्धेत जिल्ह्यातील ४०० हून अधिक कॅरमपटूंचा सहभाग

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी दि. २९ ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग, कॅरम असोसिएशन ऑफ पुणे आणि नवरात्र मित्र मंडळ, इंद्रायणीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कै. सोपानराव भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या १९ व्या महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा २०२५-२६ चा शुभारंभ बुधवारी महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहात (Mayor Cup Carrom)झाला.

 

चिंचवड येथील कै. मनिषा भोईर विरंगुळा केंद्र, प्रेमलोक पार्क, सावरकर उद्यानाशेजारी आयोजित या स्पर्धेत पुरुष, महिला आणि ज्येष्ठ नागरिक गटांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. २९ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ४०० हून अधिक कॅरमपटू आपले कौशल्य पणाला लावणार (Mayor Cup Carrom)आहेत.

 

कॅरमसारख्या बौद्धिक, कौशल्याधारित आणि एकाग्रतेची कसोटी पाहणाऱ्या खेळाला प्रोत्साहन देणे, नवोदित खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि शहरातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश (Mayor Cup Carrom)आहे.

 

स्पर्धेतील विविध गटांतील विजेत्यांना एकूण ₹३.५६ लाखांची रोख पारितोषिके तसेच आकर्षक चषक व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात येणार (Mayor Cup Carrom)आहेत.

 

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील तसेच जिल्हाभरातील खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित (Mayor Cup Carrom)होते.

 

महापौर रवि लांडगे म्हणाले, “कॅरम हा केवळ मनोरंजनाचा खेळ नसून एकाग्रता, संयम, अचूकता आणि निर्णयक्षमता विकसित करणारा खेळ आहे. महापौर चषक स्पर्धेमुळे शहर व जिल्ह्यातील खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होत आहे. अशा स्पर्धांमधून नवोदितांना प्रेरणा मिळते, स्पर्धात्मक वातावरण निर्माण होते आणि क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळते. सर्व स्पर्धकांनी क्रीडाभावना जपत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन (Mayor Cup Carrom)करावे.”

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले, “कै. सोपानराव भोईर यांच्या स्मृतींना अभिवादन करणारी ही स्पर्धा त्यांच्या क्रीडाप्रेमाचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी वारसा पुढे नेणारी आहे. महापौर चषकाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत खेळाडूंना समान संधी मिळत असून, अशा स्पर्धांमधून भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडतील, असा विश्वास (Mayor Cup Carrom)आहे.”


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00