(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:)मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. गेल्या सुमारे ७२ तासांपासून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अक्षय सावंत यांना शनिवारी दुपारी बचाव पथकाने बाहेर काढले. मात्र, उपचारासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित (Akshay Sawant Moshi)केले.
शनिवारी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास एनडीआरएफ आणि अन्य बचाव पथकांनी अथक प्रयत्नांनंतर अक्षय सावंत यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. तब्बल ७२ तासांनंतर त्यांची सुटका झाल्याने घटनास्थळी उपस्थित अधिकारी, बचाव पथके आणि नातेवाईकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित (Akshay Sawant Moshi)केले.
दरम्यान, या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. अधिकृत माहितीनुसार, अद्यापही सात जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता असून त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ, लष्कर, अग्निशमन दल, स्थानिक प्रशासन आणि श्वान पथक युद्धपातळीवर बचावकार्य राबवत (Akshay Sawant Moshi)आहेत.
घटनास्थळी तसेच वायसीएम रुग्णालयाबाहेर अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी झाली असून प्रत्येक क्षणागणिक बचाव मोहिमेच्या अपडेटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने बचावकार्य अखंडपणे सुरू असल्याचे सांगितले असून अधिकृत माहितीनंतरच पुढील तपशील जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले (Akshay Sawant Moshi)आहे.
