Home शिक्षण Pratibha Collage Chinchwad :चिंचवडमध्ये प्रतिभा महाविद्यालयाचा सेवाभावी उपक्रम; वारीत पथनाट्याद्वारे व्यसनमुक्ती व सायबर जनजागृती

Pratibha Collage Chinchwad :चिंचवडमध्ये प्रतिभा महाविद्यालयाचा सेवाभावी उपक्रम; वारीत पथनाट्याद्वारे व्यसनमुक्ती व सायबर जनजागृती

चिंचवडमध्ये प्रतिभा महाविद्यालयाने वारकऱ्यांसाठी सेवाभावी उपक्रम राबवला. एनएसएस विद्यार्थी वारीत पथनाट्याद्वारे व्यसनमुक्ती व सायबर जनजागृती करणार.

by Admin
Spread the love

(चिंचवड, दि. ९ जुलै) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज पहाटे चिंचवडमधून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यावेळी चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजच्या वतीने वारकऱ्यांसाठी सेवाभावी उपक्रम राबविण्यात (Pratibha Collage Chinchwad) आला.

प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा आणि संचालिका डॉ. तेजल शहा यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सुकलाल कुंभार, प्रा. सुप्रिया गायकवाड आणि सुमारे ४० स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी पालखीचे भक्तिभावाने स्वागत (Pratibha Collage Chinchwad)केले.

यावेळी दिंडीतील झेंडेकरी, पताकाधारी, टाळकरी, पखवाज वादक, वीणेकरी तसेच तुळशी वृंदावन आणि पाण्याचे हांडे डोक्यावर घेऊन चालणाऱ्या महिला वारकऱ्यांना बंद बाटलीतील पिण्याचे पाणी, बंद पाकिटातील सकस लाडू, केळी आणि सफरचंदांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेत वारकऱ्यांची सेवा करण्याचा संकल्पही व्यक्त (Pratibha Collage Chinchwad) केला.

वारीतून व्यसनमुक्ती व सायबर सुरक्षेची जनजागृती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने प्रतिभा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील अभिजीत वाघमारे, सत्यजित जाधव, सरस्वती जोशी, रिया गौतम, सिद्धेश जाधव आणि सार्थक गायकवाड या सहा विद्यार्थी प्रतिनिधींची २१ दिवसांच्या वारी कॅम्पसाठी निवड झाली (Pratibha Collage Chinchwad) आहे.

विद्यापीठाच्या मार्गदर्शनानुसार हे विद्यार्थी पालखीसोबत प्रवास करत विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करणार आहेत. व्यसनमुक्तीचा संदेश देणे तसेच सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणुकीपासून नागरिकांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश (Pratibha Collage Chinchwad) आहे.

याशिवाय वारीदरम्यान वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास मदत करणे, आवश्यक मार्गदर्शन करणे आणि सामाजिक बांधिलकी जपत सेवाभावाने कार्य करणे, ही जबाबदारीही राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी पार पाडणार(Pratibha Collage Chinchwad) आहेत.

या उपक्रमातून समाजसेवा आणि अध्यात्माचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या सेवाभावी वृत्तीचे वारकऱ्यांनी मनापासून कौतुक (Pratibha Collage Chinchwad) केले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00