Home गुन्हे Ketan Agarwal Murder:लोहगड हत्या प्रकरण : केतन अग्रवालच्या वडिलांनी उलगडला संपूर्ण घटनाक्रम; सिया गोयल व प्रियकराविरुद्ध हत्येचा आरोप

Ketan Agarwal Murder:लोहगड हत्या प्रकरण : केतन अग्रवालच्या वडिलांनी उलगडला संपूर्ण घटनाक्रम; सिया गोयल व प्रियकराविरुद्ध हत्येचा आरोप

लोहगड हत्या प्रकरणात केतन अग्रवालच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबातून साखरपुडा, लोहगडच्या वारंवारच्या भेटी, संशय आणि हत्येपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला. सिया गोयल व चेतन चौधरीविरोधातील आरोपांची माहिती.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:पुण्यातील तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक घडामोडी समोर आल्या आहेत. सुरुवातीला अपघाती मृत्यू मानल्या गेलेल्या या प्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली (Ketan Agarwal Murder)आहे.

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात साखरपुड्यापासून ते हत्येपर्यंतचा घटनाक्रम स्पष्ट केला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये केतन आणि सिया यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर सिया वारंवार केतनला लोहगड किल्ल्यावर जाण्याचा आग्रह करत होती. कुटुंबीयांनी सुरुवातीला नकार दिला असला तरी तिच्या आग्रहामुळे त्यांनी काही वेळा परवानगी (Ketan Agarwal Murder)दिली.

दरम्यान, केतनने सियाच्या वागणुकीबाबत संशय व्यक्त करत तिच्याबद्दल पूर्ण माहिती घेतली आहे का, असा प्रश्न वडिलांना अनेकदा विचारला होता. तसेच तिचे चेतन चौधरीसोबत संबंध असल्याचीही शंका त्याने व्यक्त केली होती. मात्र, नातेवाईक असल्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा संशय गांभीर्याने घेतला (Ketan Agarwal Murder)नाही.

१८ जून रोजी सियाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघे पुन्हा लोहगडला गेले. काही वेळातच केतन दरीत पडल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. मात्र, नंतर घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणाहून अपघाती पडणे अवघड असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. त्यानंतर विशाल अग्रवाल यांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी कट रचून केतनची हत्या केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल (Ketan Agarwal Murder)केली.

या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर बाबींची सखोल पडताळणी केली जात आहे. अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार (Ketan Agarwal Murder)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00