Home तंत्रज्ञान Tribal Art Center :पिंपरी-चिंचवडमध्ये भारतातील पहिले आदिवासी कला-कौशल्य-कारागिरी केंद्र; महसूल मंत्र्यांची सकारात्मक भूमिका

Tribal Art Center :पिंपरी-चिंचवडमध्ये भारतातील पहिले आदिवासी कला-कौशल्य-कारागिरी केंद्र; महसूल मंत्र्यांची सकारात्मक भूमिका

पिंपरी-चिंचवडमध्ये भारतातील पहिले आदिवासी कला-कौशल्य-कारागिरी केंद्र उभारण्यास गती मिळाली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून आमदार महेश लांडगे यांच्या सात विकासकामांच्या मागण्यांनाही तत्त्वतः मंजुरी मिळाली.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी दि. २२ जून) : पिंपरी-चिंचवडमध्ये आदिवासी व वंचित घटकांतील मुलांसाठी भारतातील पहिले आदिवासी कला-कौशल्य-कारागिरी केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली आहे. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या संकल्पनेतील या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, प्रस्ताव आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार (Tribal Art Center)आहे.

 

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी मंत्रालयात महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांबाबत पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत शहराच्या विकासाशी संबंधित सात महत्त्वाच्या मागण्यांना तत्त्वतः मंजुरी देण्यात (Tribal Art Center)आली.

 

यामध्ये आदिवासी कला-कौशल्य केंद्रासाठी पहिल्या टप्प्यात १० हेक्टर व दुसऱ्या टप्प्यात ५ हेक्टर, अशी एकूण १५ हेक्टर जागा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव, मोशी येथील आयआयएम नागपूर उपशाखेसाठी जागा हस्तांतरण, प्राधिकरणातील मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांसाठी स्वतंत्र इमारती, अपर तहसीलदार कार्यालयातील पदभरती, बोपखेल, डुडूळगाव, चऱ्होली बुद्रुक व चौविसावाडी या गावांचा नगर भूमापन कार्यक्षेत्रात समावेश तसेच अपर तहसीलदार कार्यालयासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्णय घेण्यात (Tribal Art Center)आले.

 

बैठकीला पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित (Tribal Art Center)होते.

 

याबाबत आमदार महेश लांडगे म्हणाले, “क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या प्रेरणादायी भूमीत भारतातील पहिले आदिवासी कला-कौशल्य-कारागिरी केंद्र उभारले जाणार, ही पिंपरी-चिंचवडसाठी अभिमानाची बाब आहे. शहराच्या विकासाशी संबंधित अनेक प्रलंबित प्रश्न सकारात्मक निर्णयांमुळे मार्गी लागत असून नागरिकांच्या हितासाठी आमचा पाठपुरावा यापुढेही सुरू (Tribal Art Center)राहील.”

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00