Home माझं पिंपरी चिंचवड Tax Hike Proposal:करवाढीच्या प्रस्तावाविरोधातील लढ्याला यश; ‘क वर्ग ते अ वर्ग’ प्रस्ताव दप्तरी जमा

Tax Hike Proposal:करवाढीच्या प्रस्तावाविरोधातील लढ्याला यश; ‘क वर्ग ते अ वर्ग’ प्रस्ताव दप्तरी जमा

पिंपरी-चिंचवडमधील चिखली, मोशी, डुडुळगाव आणि चऱ्होली भागांचा ‘क वर्ग’ ते ‘अ वर्ग’ दर्जा बदलण्याचा प्रस्ताव दप्तरी जमा. नगरसेवक विकास साने यांच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांना संभाव्य करवाढीपासून दिलासा.

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. १५ जून : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील चिखली, मोशी, डुडुळगाव आणि चऱ्होली या भागांचा करप्रणालीतील ‘क वर्ग’ ते ‘अ वर्ग’ असा दर्जा बदलण्याचा प्रस्ताव अखेर दप्तरी जमा करण्यात आला आहे. नगरसेवक विकास नामदेव साने यांनी या प्रस्तावाविरोधात सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हजारो नागरिकांना संभाव्य करवाढीपासून दिलासा मिळाला(Tax Hike Proposal)आहे.

 

५ मे २०२६ रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक विकास साने यांनी या प्रस्तावाला ठाम विरोध दर्शविला होता. संबंधित भागांमध्ये अद्यापही अनेक मूलभूत सुविधा अपुऱ्या असताना नागरिकांवर अतिरिक्त कराचा बोजा टाकणे अन्यायकारक ठरेल, अशी भूमिका त्यांनी सभागृहात मांडली (Tax Hike Proposal)होती.

 

यावेळी बोलताना साने यांनी महापालिकेतील अनावश्यक खर्च आणि आर्थिक अपव्ययावरही बोट ठेवले. कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती, विविध विभागांतील वाढता खर्च आणि निधी नियोजनातील त्रुटींमुळे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. “प्रथम नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्या, आर्थिक अपव्यय थांबवा आणि त्यानंतरच करवाढीचा विचार करा,” अशी मागणी त्यांनी केली (Tax Hike Proposal)होती.

 

नगरसेवक साने यांच्या आक्रमक भूमिकेला आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून संबंधित प्रस्ताव प्रशासनाने दप्तरी जमा केला आहे. त्यामुळे चिखली, मोशी, डुडुळगाव आणि चऱ्होली परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले(Tax Hike Proposal) आहे.

 

याबाबत प्रतिक्रिया देताना विकास साने म्हणाले, “नागरिकांवर अन्यायकारक करवाढ लादण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला आहे. आवश्यक सुविधा न देता करवाढ करणे योग्य नव्हते. हा विजय माझा नसून परिसरातील सर्व नागरिकांचा आहे. नागरिकांच्या हिताविरुद्ध जाणारा कोणताही निर्णय आम्ही खपवून घेणार नाही. सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी माझा संघर्ष यापुढेही सुरू (Tax Hike Proposal)राहील.”

 

महापालिका प्रशासनाने प्रस्ताव दप्तरी जमा केल्याने विकास साने यांच्या भूमिकेला बळ मिळाले असून नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली (Tax Hike Proposal)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00