Home प्रेरणा / यशकथा COD Workers Society:सीओडी कामगार स्वाभिमान पॅनलचे दणदणीत यश; दोन्ही निवडणुकांत वर्चस्व

COD Workers Society:सीओडी कामगार स्वाभिमान पॅनलचे दणदणीत यश; दोन्ही निवडणुकांत वर्चस्व

देहूरोड येथील सीओडी वर्कर्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि सीओडी वर्क्स कमिटीच्या निवडणुकांत सीओडी कामगार स्वाभिमान पॅनलने घवघवीत विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले.

by Admin
Spread the love

देहूरोड, दि. ११ जून : देहूरोड येथील सेंट्रल ऑर्डनन्स डेपो (सीओडी) मधील प्रतिष्ठेच्या सीओडी वर्कर्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि सीओडी वर्क्स कमिटी निवडणुकांमध्ये सीओडी कामगार स्वाभिमान पॅनलने घवघवीत यश मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. विरोधी सीओडी संयुक्त कामगार आघाडी पॅनलचा दोन्ही निवडणुकांत पराभव (COD Workers Society)झाला.

मंगळवारी (दि. ९) कडक शिस्त आणि उत्साही वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. सीओडी वर्कर्स सोसायटीच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत स्वाभिमान पॅनलचे प्रमोद मलगेकर, कपिल भुजबळ, विलास जगताप, शितल कनौजिया, कोमल आल्हाट, सतिश शिंदे, सचिन साळवी आणि अहिल्या दडस हे उमेदवार विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्था उपनिबंधक मुकुंद पवार यांनी काम (COD Workers Society)पाहिले.

तसेच सीओडी वर्क्स कमिटीच्या निवडणुकीत स्वाभिमान पॅनलचे आकाश पिल्लई, संजय डुमडे, निलेश भेगडे, संतोष शितकल, उमाकांत लीलाकर, विक्रम टकले, विकास बालघरे, मनीषकुमार, अमित कुमार आणि एकनाथ टिळेकर यांनी विजय (COD Workers Society)मिळविला.

डेपोचे निवडणूक अधिकारी कर्नल अखिलेश कुमार व मुख्य निवडणूक अधिकारी मेजर वसंत रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली. डेपोचे कमांडंट ब्रिगेडियर विकांत गंभीर यांनी निवडणुका शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पडल्याबद्दल कामगार, प्रशासन आणि निवडणूक अधिकाऱ्यांचे अभिनंदन (COD Workers Society) केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00