Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Property Tax:पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २३० कोटींहून अधिक मालमत्ता कर वसूल

PCMC Property Tax:पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २३० कोटींहून अधिक मालमत्ता कर वसूल

दोन लाखांहून अधिक मिळकतधारकांनी भरला कर; ऑनलाइन भरण्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद

by Admin
Spread the love

पिंपरी | प्रतिनिधी:पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन च्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये १ एप्रिल ते २६ मे २०२६ (दुपारी १२ वाजेपर्यंत) या कालावधीत तब्बल २३० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कर वसूल केला आहे. आतापर्यंत शहरातील २ लाख ३२ हजार ३८५ मिळकतधारकांनी मालमत्ता कराचा भरणा केला असून, उर्वरित नागरिकांनी लवकरात लवकर कर भरावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले (PCMC Property Tax)आहे.

 

महापालिकेकडून ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मोठ्या प्रमाणावर नागरिक ऑनलाइन माध्यमातून कर भरत (PCMC Property Tax)आहेत.

 

आतापर्यंत २ लाख ८ हजार ५७० नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरून १० टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. या माध्यमातून २१२ कोटी रुपयांहून अधिक कराची वसुली करण्यात आली आहे. त्यामुळे डिजिटल व्यवहारांप्रती नागरिकांचा वाढता कल स्पष्ट होत (PCMC Property Tax)आहे.

 

पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र वापराच्या तसेच मोकळ्या जागांसह एकूण ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या सर्व मालमत्ताधारकांना चालू आर्थिक वर्षाची कर देयके वेळेत उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाने (PCMC Property Tax)सांगितले.

 

महिलांच्या नावावरील मालमत्ता, दिव्यांग नागरिक तसेच पर्यावरणपूरक गृहनिर्माण संस्थांसाठीही विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. ऑनलाइन कर भरणाऱ्यांना १० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर डिजिटल सुविधेचा वापर करत (PCMC Property Tax)आहेत.

 

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महापालिकेच्या कार्यालयात प्रत्यक्ष गर्दी टाळून घरबसल्या ऑनलाइन माध्यमातून मालमत्ता कर भरावा, असे आवाहन प्रशासनाने केले (PCMC Property Tax)आहे.

 

आयुक्तांचे आवाहन

डॉ . विजय सूर्यवंशी म्हणाले, “नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरून महापालिकेच्या विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे, ही समाधानाची बाब आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि इतर नागरी सेवांसाठी मालमत्ता कर हा महत्त्वाचा आर्थिक स्रोत आहे. ज्या नागरिकांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांनी ३० जूनपूर्वी कर भरून सवलतींचा लाभ (PCMC Property Tax)घ्यावा.”

 

उपायुक्तांची माहिती

 

सचिन पवार यांनी सांगितले की, “आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये आतापर्यंत २३० कोटींहून अधिक मालमत्ता कर संकलित झाला आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी ऑनलाइन माध्यमातून कर भरण्यास प्राधान्य दिले असून, त्यातून १० टक्के सवलतीचाही लाभ घेतला आहे. सुरक्षित आणि सुलभ ऑनलाइन सुविधेचा अधिकाधिक नागरिकांनी वापर (PCMC Property Tax)करावा.”

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00