पिंपरी : प्रतिनिधी:स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरास युवक-युवतींसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजहिताचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून “रक्तदान हेच जीवनदान” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत (Blood Donation Camp) पोहोचला.
या रक्तदान शिबिरात एकूण ३९ जणांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी ६ जणांचे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे त्यांना रक्तदान करता आले नाही. उर्वरित सर्व रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत मानवतेचा आदर्श निर्माण (Blood Donation Camp)केला.
विशेष म्हणजे युवकांसोबत महिलांनीही मोठ्या उत्साहाने रक्तदान करत समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले. रक्तदानाच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, या भावनेतून नागरिकांनी या शिबिरात सहभाग (Blood Donation Camp) घेतला.
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्वश्री सुजितजी, शैलेश भिडे, श्री. दीपक नलावडे, मंडळाची कार्यकारिणी, जनकल्याण रक्तपेढी, पुणे तसेच सोशल मीडियाचे विशेष सहकार्य (Blood Donation Camp)लाभले.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान… एक थेंब रक्त अनेकांना जीवनदान देऊ शकते,” असा संदेश देत सर्व रक्तदाते, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांचे श्री. दिपक पंडित यांनी मनःपूर्वक आभार (Blood Donation Camp)मानले.
