Home मनोरंजन Lions Singing Idols:‘लायन्स सिंगिंग ऑयडाल्स’ राज्यस्तरीय गायक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Lions Singing Idols:‘लायन्स सिंगिंग ऑयडाल्स’ राज्यस्तरीय गायक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यभरातील स्पर्धकांच्या सुरेल सादरीकरणाने चिंचवडमधील प्रेक्षागृह दुमदुमले

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. २४ मे २०२६ : इंडियन म्युझिकल क्लब आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लायन्स सिंगिंग ऑयडाल्स’ राज्यस्तरीय गायक स्पर्धा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उत्साहात पार पडली. अंतिम फेरीत विविध गटांतील स्पर्धकांनी वाद्यवृंदासह दमदार गायन सादर करत उपस्थितांची दाद (Lions Singing Idols)मिळवली.

 

या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध पार्श्वगायक राजेश दातार, इंडियन म्युझिकल क्लबचे संस्थापक अनिल झोपे, राखी झोपे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, तसेच लायन्स क्लब इंटरनॅशनलचे पदाधिकारी उपस्थित(Lions Singing Idols) होते.

 

सहा महिन्यांच्या कालावधीत विविध टप्प्यांत पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे १९५ गायकांनी सहभाग घेतला होता. आठ नामवंत गायनतज्ज्ञांच्या परीक्षणानंतर अंतिम फेरीसाठी स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. स्पर्धा चार गटांत घेण्यात (Lions Singing Idols)आली.

 

पाच ते पंधरा वयोगटात देवांश घाटे प्रथम, प्रिन्सी गाठे द्वितीय आणि रिद्धी गायकवाड तृतीय ठरले. सोळा ते चाळीस वयोगटात शरण्या पेणगर प्रथम, अस्मिता मुखर्जी द्वितीय आणि आसावरी गुडदे तृतीय ठरल्या. चाळीस ते पंचाहत्तर वयोगटात विशाल फडतरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर स्वाती केसकर आणि संजय लागू यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. युगुलगायन गटात विक्रम कुंटे – शुभांगी पांचाळ जोडी प्रथम, आकाश जाधव – आदित्य काळे द्वितीय आणि प्राची कर्णिक – जयरामन तृतीय (Lions Singing Idols)ठरले.

 

विजेत्यांना रोख पारितोषिके आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात (Lions Singing Idols)आले.

 

राजेश दातार यांनी अंतिम फेरीचे परीक्षण करताना स्पर्धकांना गायनासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ‘मधुबन में राधिका नाचे रे’, ‘दर्दे दिल दर्दे जिगर’ आणि ‘ना जा कही अब न जा’ ही गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध(Lions Singing Idols) केले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इंडियन म्युझिकल क्लबच्या सदस्यांनी संयोजन, ध्वनिसंयोजन, छायाचित्रण आणि रंगमंच व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली. मिलिंद बावा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर अनिल झोपे यांनी आभार (Lions Singing Idols)मानले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00