Home प्रेरणा / यशकथा Padmashree Anna Hajare:पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मानाने अण्णा हजारे गौरविले

Padmashree Anna Hajare:पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मानाने अण्णा हजारे गौरविले

पद्मश्री अण्णा हजारे यांचा नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार देऊन राळेगण सिद्धी येथे भव्य सत्कार

by Admin
Spread the love

पिंपरी | प्रतिनिधी:जेष्ठ समाजसेवक तथा पद्मभूषण अण्णा हजारे यांना पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान’ प्रदान करून गौरविण्यात आले. आदर्शगाव राळेगणसिद्धी येथे शनिवारी (२३ मे २०२६) आयोजित कार्यक्रमात टाटा मोटर्सचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात (Padmashree Anna Hajare) आला.

 

सन्मान स्वीकारल्यानंतर बोलताना अण्णा हजारे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाचा जीवनगौरव सन्मान मिळाल्याने मी कृतार्थ झालो आहे. राळेगणसिद्धी हे गाव आदर्शगाव बनविण्यात मनोहर पारळकर यांचे मोठे योगदान (Padmashree Anna Hajare)आहे.”

 

या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत पाटोळे यांना ‘पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार’, राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कारविजेते कवी सीताराम नरके यांना ‘पद्मश्री नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार’ तसेच कामगार कवी प्रभाकर वाघोले यांना ‘पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सन्मान’ प्रदान करण्यात (Padmashree Anna Hajare) आला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे होते. यावेळी डॉ. संभाजी मलघे, अरुण गराडे, जयवंत भोसले, सुधीर कांबळे, रंजना वाघ, सुरेखा कांबळे, संतोष गाढवे, स्वाती भोसले तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित(Padmashree Anna Hajare) होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगारभूषण राजेंद्र वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम सदाफुले यांनी (Padmashree Anna Hajare) मानले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00