Home गुन्हे Donation Box Theft:संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर दानपेटी चोरी प्रकरण; सेवेकऱ्याच्या घरातून पावणे चार लाखांची रोकड जप्त

Donation Box Theft:संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर दानपेटी चोरी प्रकरण; सेवेकऱ्याच्या घरातून पावणे चार लाखांची रोकड जप्त

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीतील रक्कम लंपास केल्याप्रकरणी सेवेकरी विशाल वारुळे याच्या घरातून पावणे चार लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीतील रकमेवरच सेवेकऱ्याने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशाल वारुळे असे संबंधित सेवेकऱ्याचे नाव असून, त्याच्या घरातून तब्बल पावणे चार लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही रोकड १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटांनी भरलेल्या पिशव्यांमध्ये आढळून (Donation Box Theft)आली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल वारुळे हा गेल्या तीन महिन्यांपासून मंदिरातील दानपेटीतील रक्कम जमा करणे आणि तिची मोजणी करण्याचे काम पाहत होता. याच कालावधीत त्याने हातचलाखी करत दानपेटीतील काही रक्कम बाजूला काढून स्वतंत्र पिशव्यांमध्ये साठवण्यास सुरुवात केल्याचा संशय व्यक्त केला जात (Donation Box Theft)आहे.

 

तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या दिवशी तो रोकड भरलेली पिशवी घरी नेत असे, त्या दिवशी मंदिरातील हार घेऊन जात असल्याचे सांगत असे. पिशवीच्या वरच्या भागात हार ठेवून खाली रोकड लपवली जात होती. त्यामुळे कोणालाही संशय येत नव्हता. घरी गेल्यानंतर तो ही रोकड मोजून पिशवीसह बेडमध्ये लपवून ठेवत असल्याची माहिती तपासातून समोर आली(Donation Box Theft) आहे.

 

या प्रकारामुळे मंदिर प्रशासन तसेच सेवेकऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भक्तांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात (Donation Box Theft)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00