Home प्रेरणा / यशकथा The Ultimate Nutan :चला चला जाऊ सिनेमाला… सिने अभिनेत्री नूतन : चार दशकांचा सुवर्ण चित्रपट प्रवास नूतन – भाग २

The Ultimate Nutan :चला चला जाऊ सिनेमाला… सिने अभिनेत्री नूतन : चार दशकांचा सुवर्ण चित्रपट प्रवास नूतन – भाग २

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री नूतन यांच्या अभिनय कारकीर्दीचा भावस्पर्शी आढावा. देव आनंद, राज कपूर, दिलीप कुमार ते अमिताभ बच्चनपर्यंतच्या त्यांच्या अविस्मरणीय चित्रपट प्रवासाची खास कहाणी.

by Admin
Spread the love

हिंदी चित्रपटसृष्टीवर तब्बल चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे नूतन. सौंदर्य, सहज अभिनय, भावपूर्ण डोळे आणि पडद्यावरची निरागसता यामुळे त्यांनी रसिकांच्या मनावर कायमस्वरूपी छाप (The Ultimate Nutan) उमटवली.

 

सामान्यतः अनेक अभिनेत्री विवाहानंतर चित्रपटसृष्टीपासून दूर जातात. मात्र नूतन या त्याला अपवाद ठरल्या. विवाहानंतर संसार आणि अभिनय यांचा सुंदर समतोल साधत त्यांनी यशस्वी कारकीर्द सुरू ठेवली. नियमित व्यायाम, संतुलित आहार, शिस्तबद्ध दिनचर्या आणि स्वतःच्या आरोग्याची घेतलेली काळजी यामुळे त्या कायम ताज्यातवाण्या दिसत राहिल्या. मातृत्वानंतरही त्यांनी स्वतःची तब्येत उत्तम राखली आणि अभिनयातील तेज कायम (The Ultimate Nutan)ठेवले.

 

“ये रातें ये मौसम नदी का किनारा…” (दिल्ली का ठग) पासून ते

“हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिये…” (कर्मा) पर्यंतचा त्यांचा चित्रपट प्रवास खरोखरच दैदिप्यमान(The Ultimate Nutan) ठरला.

 

राज खोसला दिग्दर्शित “मैं तुलसी तेरे आंगन की” या चित्रपटात नूतन आणि आशा पारेख या दोन दमदार अभिनेत्रींच्या अभिनयाची अप्रतिम जुगलबंदी पाहायला मिळते. आशा पारेख यांनी साकारलेली तवायफेची मुलगी आणि तिच्यावर प्रेम करणारा विजय आनंद यांची कथा भावनिक वळण घेत(The Ultimate Nutan) जाते.

 

एका प्रसंगात आशा पारेख तबकडीवर गाणे लावतात —

“आजा रे… मेरी बरबाद मोहब्बत के सहारे…”

आणि त्याचवेळी विजय आनंद दुसरी तबकडी लावत म्हणतात —

“जवां है मोहब्बत, हसीं है (The Ultimate Nutan)जमाना…”

 

मात्र अखेरीस विजय आनंद यांचे लग्न नूतन यांच्याशी होते. त्यानंतरही नूतन आशा पारेख यांच्या मुलाला मायेने सांभाळताना दिसतात. स्त्रीमनातील विशालता त्यांनी आपल्या अभिनयातून अत्यंत प्रभावीपणे (The Ultimate Nutan)साकारली.

 

“बंदिनी” या चित्रपटातील

“मोरा गोरा अंग ले ले…”

या गीतातून नूतन यांचा अभिनय एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलेला दिसतो. त्यांच्या अभिनयात भावना इतक्या सहज मिसळलेल्या असत की, जणू पाण्यात रंग मिसळावा तसे त्या भूमिकेत एकरूप(The Ultimate Nutan) होत.

 

“पेइंग गेस्ट” चित्रपटात देव आनंद यांच्यासोबत त्यांनी रंगतदार भूमिका केली.

“छोड दो आंचल जमाना क्या कहेगा…”

हे गाणे आजही रसिकांच्या ओठांवर(The Ultimate Nutan) आहे.

 

“दिल ही तो है” या चित्रपटात त्यांनी राज कपूर यांच्यासोबत काम केले. प्राण यांचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका होती.

“तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात (The Ultimate Nutan)नहीं…”

हे गाणे पडद्यावर राज कपूर म्हणत असले तरी त्यातील नूतन यांचा भावस्पर्शी अभिनय आजही मनाला भिडतो. डोक्यावर पदर, हातातील फुलांचा गुच्छ आणि डोळ्यांतून व्यक्त होणाऱ्या भावना — हे सगळे दृश्य आजही तितकेच ताजे (The Ultimate Nutan)वाटते.

 

याच चित्रपटातील

“निगाहें मिलाने को जी चाहता है…”

ही कव्वाली विशेष गाजली. संगीतकार रोशन यांच्या सुरेल संगीताला नूतन यांच्या सादरीकरणाची सुंदर साथ (The Ultimate Nutan)लाभली.

 

“मधुबन खुशबू देता है…” (साजन बिना सुहागन),

“फूल तुम्हें भेजा है खत में…” (सरस्वतीचंद्र),

“चाँद फिर निकला मगर तुम ना आये…” (पेइंग गेस्ट)

ही गाणी आजही रसिकांच्या स्मरणात(The Ultimate Nutan) आहेत.

 

देव आनंद, राज कपूर, दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, सुनील दत्त यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले. पुढे अमिताभ बच्चन यांच्या काळातही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप कायम (The Ultimate Nutan)ठेवली.

 

ताराचंद बडजात्या निर्मित “सौदागर” चित्रपटातील

“तेरा मेरा साथ रहे…”

हे गीत त्यांच्या अभिनयातील कोमलता अधोरेखित करते.

 

तर “मेरी जंग” या चित्रपटात त्यांनी अनिल कपूर यांच्या आईची भूमिका साकारली. या चित्रपटातील —

“जीत जायेंगे हम, तू अगर संग है…”

हे गीत जीवनातील संघर्ष आणि आशावाद यांचे प्रतीक (The Ultimate Nutan)ठरते.

 

जीवन म्हणजे संघर्ष, प्रयत्न आणि सातत्य. यश-अपयशाच्या वाटेवर खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा नूतन यांच्या चित्रपट प्रवासातून (The Ultimate Nutan)मिळते.

 

चला, पुन्हा भेटूया पुढील शुक्रवारी एका नव्या सिनेमाई आठवणीसोबत…

 

— सुरेश कंक

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00