पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा प्रतिष्ठित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ यंदा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि हिंदुत्ववादी नेते महेश लांडगे यांना जाहीर करण्यात आला (MLA Mahesh Landge) आहे.
ब्राह्मण जागृती सेवा संघ यांच्या वतीने या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती संयोजक राजन लोणकर यांनी पत्रकाद्वारे (MLA Mahesh Landge)दिली.
दरवर्षी सावरकर जयंतीनिमित्त विविध वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे यंदाही विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ‘सावरकर समजून घेताना’ या विषयावर माजी सनदी अधिकारी तथा ‘चाणक्य मंडळ परिवार’चे प्रमुख अविनाश धर्माधिकारी हे मार्गदर्शन करणार (MLA Mahesh Landge)आहेत.
निगडीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात होणारा हा सोहळा विचार आणि कर्तृत्वाचा संगम ठरणार असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले (MLA Mahesh Landge)आहे.
दरम्यान, पुरस्कार जाहीर करताना आयोजकांनी सांगितले की, महेश लांडगे हे पिंपरी-चिंचवडसह राज्यभर हिंदुत्ववादी वक्ते म्हणून परिचित आहेत. धर्मजागरण, गोरक्षा आणि सामाजिक ऐक्य या विषयांवर ते सातत्याने कार्यरत असून विविध हिंदू संमेलनांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करत आहेत. ‘देव, देश आणि धर्म’ या त्रिसूत्रीवर आधारित त्यांच्या कार्याची दखल घेत यंदाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ त्यांना जाहीर करण्यात आल्याचे आयोजकांनी (MLA Mahesh Landge)स्पष्ट केले.
