Home गुन्हे Mahalunge MIDC Police:दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी; २३ गुन्ह्यांची उकल, ५२ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत

Mahalunge MIDC Police:दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी; २३ गुन्ह्यांची उकल, ५२ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी २३ चोरीचे गुन्हे उघडकीस आणत ५२ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करून मूळ मालकांना परत केला.

by Admin
Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याने विविध चोरीच्या गुन्ह्यांची उकल करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलिसांनी एकूण २३ गुन्हे उघडकीस आणत तब्बल ५२ लाख ९१ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ मालकांना परत (Mahalunge MIDC Police)केला.

 

शनिवार (दि. १६ मे २०२६) रोजी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या हस्ते नागरिकांना मुद्देमाल सुपूर्द करण्यात (Mahalunge MIDC Police)आला.

पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहन चोरी, घरफोडी आणि इतर चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दक्षिण महाळुंगे पोलिसांनी समांतर तपास करत चोरीला गेलेल्या मोटारसायकली, मोबाईल, सोन्याचे दागिने, टेम्पो आणि रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल जप्त (Mahalunge MIDC Police)केला.

 

दीर्घकाळानंतर आपली वाहने, मोबाईल आणि मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार (Mahalunge MIDC Police)मानले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात (Mahalunge MIDC Police)आली.

या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, महिला पोलीस हवालदार अर्चना काळे, दत्तात्रेय कुंभार तसेच दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम (Mahalunge MIDC Police)घेतले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00