Home माझं पिंपरी चिंचवड Shivchatrapati Award :महापौर चषक कबड्डी स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा गौरव

Shivchatrapati Award :महापौर चषक कबड्डी स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा गौरव

पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:पिंपरी चिंचवड हे शहर कबड्डी खेळाची पंढरी म्हणून ओळखले जाते. या शहरातून अधिकाधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत तसेच क्रीडा नगरी म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नाव देशभरात अधिक उज्ज्वल व्हावे, असे प्रतिपादन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी केले. प्रो कबड्डी लीगमुळे खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असून भविष्यात अधिकाधिक खेळाडूंनी या क्षेत्रात यश मिळवावे, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी (Shivchatrapati Award) दिल्या.

महापौर रवि लांडगे यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भोसरी येथील गावजत्रा मैदानावर “महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यावेळी ते बोलत (Shivchatrapati Award )होते.

कार्यक्रमाला महापौर रवि लांडगे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्य तथा शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, नगरसदस्य निलेश तरस, नगरसदस्या सुलभा उबाळे, उपायुक्त पंकज पाटील, क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे, क्रीडा पर्यवेक्षक दीपक कन्हेरे, क्रीडा पर्यवेक्षक अरुण कडूस यांच्यासह मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी आणि नागरिक उपस्थित (Shivchatrapati Award )होते.

 

यावेळी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये बॉक्सिंग क्षेत्रातील १९९७-९८ चे शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय यादव, कबड्डी क्षेत्रातील २०१५-१६ च्या पुरस्कार विजेत्या पूजा शेलार, कबड्डीपटू राजू घुले, सायकलिंग क्षेत्रातील २००३-०४ च्या पुरस्कार विजेत्या मीनाक्षी शिंदे, जलतरण क्षेत्रातील २०२०-२१ च्या पुरस्कार विजेत्या वैष्णवी जगताप तसेच कबड्डी क्षेत्रातील २०२३-२४ चे शिवछत्रपती पुरस्कार विजेते विराज लांडगे यांचा समावेश (Shivchatrapati Award ) होता.

या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे पिंपरी चिंचवडमधील क्रीडा संस्कृतीला अधिक चालना मिळणार असून युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त(Shivchatrapati Award )केला.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00