Home माझं पिंपरी चिंचवड Sampraday Controversy:आळंदीत विकास लवांडेंवर शाईफेक; वारकरी संप्रदायातील ‘घुसखोरी’च्या आरोपावरून वाद तीव्र

Sampraday Controversy:आळंदीत विकास लवांडेंवर शाईफेक; वारकरी संप्रदायातील ‘घुसखोरी’च्या आरोपावरून वाद तीव्र

वारकरी संप्रदायात कथित घुसखोरीच्या आरोपावरून वाद चिघळला असून आळंदीत राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली. घटनेनंतर निषेध आंदोलन करण्यात आले.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :वारकरी संप्रदायातील कथित ‘घुसखोरी’च्या मुद्द्यावरून राज्यात सुरू असलेला वाद आता अधिक चिघळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात मनुवादी आणि कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे लोक घुसल्याचा आरोप केल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या वादाचे पडसाद आता आळंदी परिसरात उमटू लागले (Sampraday Controversy) आहेत.

 

हवेली तालुक्यातील म्हातोबाची आळंदी येथे आज सकाळी विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली. हभप संग्राम भंडारे यांनी ही शाईफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आळंदीत निषेध आंदोलन करण्यात (Sampraday Controversy)आले.

 

गेल्या काही वर्षांपासून वारकरी संप्रदायात कट्टर हिंदुत्ववादी आणि धारकरी विचारांचे लोक शिरल्याचा आरोप पुरोगामी चळवळीतील काही कार्यकर्त्यांकडून सातत्याने केला जात आहे. वारकरी चळवळ ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही दावा करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काही कीर्तनकार आणि महंतांच्या भूमिकांवर भाष्य करत विस्तृत लेख लिहिला होता. त्यानंतर काही नावांची राज्यभर चर्चा रंगली (Sampraday Controversy)होती.

 

दरम्यान, विकास लवांडे यांनी काही कीर्तनकारांवर थेट टीका करत वारकरी संप्रदायात ‘घुसखोर’ शिरल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हा वाद आणखी तीव्र झाला (Sampraday Controversy)आहे.

 

आळंदीत झालेल्या निषेध आंदोलनावेळी संदीप नाईकरे यांनी संग्राम भंडारे यांच्यावर जोरदार टीका केली. “संग्राम भंडारे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे महाराज आहेत. यापूर्वीही त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात घेतलेली भूमिका महाराष्ट्राने पाहिली आहे,” असा आरोप त्यांनी (Sampraday Controversy)केला.

 

तसेच, “स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि वारकरी संप्रदायाचा वापर करण्याचा प्रयत्न काही हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जात आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे,” असेही ते म्हणाले. यावेळी काही तथाकथित महाराजांच्या भोंदूगिरीवरही त्यांनी टीका (Sampraday Controversy)केली.

 

या निषेध आंदोलनात विलास कुऱ्हाडे, संजय वडगांवकर, योगीराज सातपुते, सुदीप गरुड यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले(Sampraday Controversy) होते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00