Home प्रेरणा / यशकथा Poetry Conference:थेरगावमध्ये रंगला लेखक-वाचक संवाद; कविसंमेलन आणि पुरस्कार सोहळा उत्साहात

Poetry Conference:थेरगावमध्ये रंगला लेखक-वाचक संवाद; कविसंमेलन आणि पुरस्कार सोहळा उत्साहात

Poetry Conference:प्रा. रूपाली अवचरे यांचे प्रतिपादन – वाचनातून जीवन समृद्ध होते, पुस्तकांमुळे संस्कारक्षम समाज घडतो

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. २२ एप्रिल २०२६ : थेरगाव येथे संवाद व्यासपीठाच्या वतीने आयोजित लेखक-वाचक संवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात कविसंमेलन आणि कार्यकर्तृत्व पुरस्कार वितरण सोहळ्याचाही समावेश (Poetry Confrence )होता.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिका प्रा. रूपाली अवचरे होत्या. यावेळी बोलताना त्यांनी, ‘वाचनातून जीवन समृद्ध होते. आयुष्यातील यश-अपयशावर मात करण्याचे बळ पुस्तके देतात. त्यामुळे माणूस संस्कारक्षम होतो,’ असे मत व्यक्त(Poetry Confrence ) केले.

 

यावेळी ज्येष्ठ कवी सुरेश कंक, चंद्रकांत धस, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नगरसेविका शालिनी गुजर, अविनाश रानवडे, कांचन दीक्षित, जगन्नाथ फडतरे आदी मान्यवर उपस्थित(Poetry Confrence ) होते.

 

कार्यक्रमात सोळा कवींनी आपल्या कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली. तसेच युवा अभिनेत्री श्रुती उबाळे, नाना शिवले, तृप्ती निंबळे, गोविंद चौधरी आणि राजेंद्र शिंदे यांना कार्यकर्तृत्व पुरस्काराने गौरविण्यात (Poetry Confrence ) आले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरीश मोरे यांनी केले. सूत्रसंचालन सुहास घुमरे यांनी तर आभार प्रदर्शन लीना कोंडे यांनी(Poetry Confrence ) मानले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00