Home गुन्हे Minor Girl Assault:काळेवाडी अत्याचार प्रकरण | अडीच वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार, आरोपी अटकेत

Minor Girl Assault:काळेवाडी अत्याचार प्रकरण | अडीच वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार, आरोपी अटकेत

पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी येथे अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार. आरोपी विजय भोसले अटकेत. परिसरात संताप, पोलिसांकडून पुढील तपास सुरू.

by Admin
Spread the love

पिंपरी (प्रतिनिधी):काळेवाडी परिसरात अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक ( Minor Girl Assault) अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना सोमवारी (दि. १३) दुपारी सुमारे एकच्या सुमारास घडली.

या प्रकरणी पीडित चिमुरडीच्या आईने काळेवाडी पोलिस ठाण्यात ( Minor Girl Assault) फिर्याद दिली असून विजय भोसले (वय ४७, रा. काळेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चिमुरडीला ( Minor Girl Assault)आंबा देण्याचे आमिष दाखवून तिला जवळच्या खोलीत नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. काही वेळाने चिमुरडी अस्वस्थ दिसू लागल्याने तिच्या आईला संशय आला. पुढील चौकशीत हा प्रकार उघडकीस आला.

घटनेनंतर चिमुरडीच्या आईने ( Minor Girl Assault)तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आणि आरोपीला ताब्यात घेतले. पीडित चिमुरडीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पुढील तपास काळेवाडी पोलिस ( Minor Girl Assault) करत आहेत.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00