Home प्रेरणा / यशकथा Ulhasdada Pawar :प्रतिभा जागवणारी ग्रामसंस्कृती जपणे काळाची गरज – उल्हासदादा पवार

Ulhasdada Pawar :प्रतिभा जागवणारी ग्रामसंस्कृती जपणे काळाची गरज – उल्हासदादा पवार

निगडी येथे दादाभाऊ गावडे यांच्या “गांव तसं चांगलं” पुस्तकाचे प्रकाशन; ग्रामसंस्कृती जपण्याचे आवाहन उल्हासदादा पवार यांचे.

by Admin
Spread the love

निगडी : “विज्ञानयुगात गावे झपाट्याने बदलत असताना पारंपरिक ग्रामसंस्कृती जपणे अत्यावश्यक आहे. पूर्वी काकड आरती, भूपाळी, भजन-कीर्तनातून गावजीवन समृद्ध होत असे. आज मात्र भोंदूपण वाढत असून लोक वेदनेतून त्याला बळी पडत आहेत. त्यामुळे गावपण जपत माणसाने सजग होणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी (Ulhasdada Pawar) केले.

 

निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ गावडे लिखित “गांव तसं चांगलं” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते आणि उल्हासदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार(Ulhasdada Pawar) पडला.

 

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “माती, नाती आणि संस्कृतीचा लळा आयुष्यभर टिकतो. गावगाड्यात जाती-पातीपलीकडे समाज जपला जात होता. हरवलेले गाव पुन्हा जवळ आणण्यासाठी प्रत्येकाने आपल्या गावाशी नाळ जपली (Ulhasdada Pawar) पाहिजे.”

 

लेखक दादाभाऊ गावडे यांनी मनोगतात गावातील अठरापगड माणसे हीच आपल्या लेखनाची प्रेरणा असल्याचे(Ulhasdada Pawar) सांगितले.

 

या प्रसंगी ह.भ.प. चंद्रकांत वांजळे, प्रा. तुकाराम पाटील, अरुण बोऱ्हाडे, राजेंद्र घावटे, संदीप तापकीर, अमृता देसरडा, विजय भिसे, प्रा. पांडुरंग गाडीलकर, वंदना गावडे, श्रद्धा रवी लांडगे आदी उपस्थित होते. तसेच राम गावडे, डॉ. सीमा काळभोर, सोपान खुडे, डॉ. पौर्णिमा कोल्हे, रामभाऊ सासवडे, सरपंच संदीप गावडे, पुरुषोत्तम सदाफुले यांची विशेष उपस्थिती (Ulhasdada Pawar) लाभली.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष घुले यांनी केले, तर आभार सतिश गावडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावडे परिवाराने विशेष परिश्रम (Ulhasdada Pawar) घेतले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00