Home माझं पिंपरी चिंचवड Guru Shishya Jayanti:बरे’ बोलण्यापेक्षा ‘खरे’ बोलणाऱ्यांची अडचण अधिक – साहित्यिक अनंत कराड

Guru Shishya Jayanti:बरे’ बोलण्यापेक्षा ‘खरे’ बोलणाऱ्यांची अडचण अधिक – साहित्यिक अनंत कराड

गुरूशिष्य जयंती महोत्सवात विचारमंथन; काव्य संमेलन रंगले

by Admin
Spread the love

शिरूर कासार : “सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तुलनेत साहित्यिक कार्यक्रमांना गर्दी कमी असते, मात्र दर्दी श्रोते असल्यानेच ते टिकून आहेत. ‘बरे’ बोलणाऱ्यांपेक्षा ‘खरे’ बोलणाऱ्यांचीच अधिक अडचण होते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड यांनी केले. जामखेड (जि. अहिल्यानगर) येथे आयोजित गुरूशिष्य जयंती महोत्सवात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत (Guru Shishya Jayanti) होते.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, माजी जि.प. सदस्य मधुकर (आबा) राळेभात, काव्य संमेलनाचे अध्यक्ष सय्यद आलाऊद्दीन, शर्मिला गोसावी, डॉ. विठ्ठल जाधव, सुभाष सोनवणे, आनंदा साळवे आदी मान्यवर उपस्थित (Guru Shishya Jayanti)होते.

 

साहित्यिक गोकुळ गायकवाड यांच्या पुढाकारातून शिवजयंती, महात्मा फुले जयंती आणि भीमजयंतीनिमित्त महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनानंतर शाहीर बाबासाहेब राजगुरू यांच्या स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दादासाहेब गिते यांनी महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले, तर सय्यद आलाऊद्दीन यांनी शेरोशायरीतून रसिकांशी संवाद( Guru Shishya Jayant) iसाधला.

 

यानंतर झालेल्या काव्य संमेलनात नागेश शेलार, विठ्ठल जाधव, महादेव लांडगे, निवृत्ती महाराज कानवडे, बाळासाहेब घोरपडे, चंद्रकांत चाबुकस्वार, रज्जाक शेख, हनुमंत येवले, स्वाती ठुबे, सत्यवान मंडलिक, सविता गोलेकर, प्रा. विक्रम कांबळे, संदीप पाचारणे, नवनाथ केंदळे, अभिमन्यू इंगळे, सारीका खराडे, गोविंद पाठक, तानाजी डाडर, रामदास गायकवाड, अजय भराटे, सिद्धार्थ सावंत, रंगनाथ राळेभात, बालकवी सिद्धी जगताप, कल्याणी कुर्लेकर आणि रुद्राक्ष वारे यांनी दर्जेदार कविता सादर (Guru Shishya Jayanti) केल्या.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोकुळ गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती पाटील, अलका सपकाळ आणि हनुमंत निकम महाराज यांनी केले, तर आभार एकनाथ चव्हाण यांनी मानले. महोत्सवाच्या यशासाठी निखिल धायतडक, भगवान समुद्रे, अनिल सदाफुले, संदेश धायतडक, संभाजी आव्हाड, केशवराज कोल्हे व शिक्षक परिवाराने परिश्रम (Guru Shishya Jayanti)घेतले.

 

 

गोकुळ गायकवाड यांच्या कार्याची दखल घेत अनंत कराड यांनी त्यांची एकता फाउंडेशनच्या अहिल्यानगर जिल्हा संघटकपदी नियुक्ती जाहीर केली. यावेळी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात (Guru Shishya Jayanti)आला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00