Home मनोरंजन Appasaheb Jalgaonkar Centenary:पिंपरी-चिंचवडमध्ये पं. आप्पासाहेब जळगांवकर जन्मशताब्दी निमित्त ‘स्वरसामन्वय’ची सुरेल मैफल संपन्न

Appasaheb Jalgaonkar Centenary:पिंपरी-चिंचवडमध्ये पं. आप्पासाहेब जळगांवकर जन्मशताब्दी निमित्त ‘स्वरसामन्वय’ची सुरेल मैफल संपन्न

पिंपरी-चिंचवडमध्ये पं. आप्पासाहेब जळगांवकर जन्मशताब्दी निमित्त ‘स्वरसामन्वय’ संगीत मैफल उत्साहात पार. डॉ. सुधांशु कुलकर्णी, डॉ. राधिका जोशी यांची सुरेल सादरीकरणे.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : ज्येष्ठ हार्मोनियमवादक पं. आप्पासाहेब जळगांवकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संवादिनी कला मंच आणि साहित्य संगीत कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वरसामन्वय” या अनोख्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. संवादिनी कला मंचचे अध्यक्ष श्री. संतोष घंटे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा कार्यक्रम रसिकांना हार्मोनियमच्या समृद्ध परंपरेचा आणि विविध वाद्यांच्या सुरेल संगमाचा आगळावेगळा अनुभव देणारा (Appasaheb Jalgaonkar Centenary) ठरला.

 

हा कार्यक्रम शुक्रवार, दि. १० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात उत्साहात पार (Appasaheb Jalgaonkar Centenary) पडला.

 

कार्यक्रमाची सुरुवात प्रख्यात हार्मोनियमवादक डॉ. पं. सुधांशु कुलकर्णी यांच्या विशेष सत्कार व पुरस्कार प्रदान समारंभाने झाली. यानंतर सुप्रसिद्ध गायिका डॉ. राधिका जोशी यांनी सादर केलेल्या शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या गायनाला हार्मोनियमवर श्री. सुरेश फडतरे तर तबल्यावर पार्थ ताराबादकर यांनी समर्थ साथसंगत (Appasaheb Jalgaonkar Centenary)दिली.

 

त्यानंतर डॉ. पं. सुधांशु कुलकर्णी यांचे विशेष हार्मोनियम वादन रंगले. त्यांच्या वादनाला तबल्यावर श्री. विनायक गुरव यांनी प्रभावी साथ (Appasaheb Jalgaonkar Centenary)दिली.

 

कार्यक्रमाचा समारोप “स्वरसामन्वय” या विशेष सादरीकरणाने झाला. या अनोख्या संकल्पनेतून हार्मोनियमचा प्रवास सुरांच्या माध्यमातून उलगडण्यात आला. पारंपरिक ते आधुनिक अशा विविध संगीत प्रवाहांचा सेतू बांधत, हार्मोनियम केंद्रस्थानी ठेवून विविध वाद्यांचा सुरेल संवाद सादर करण्यात आला. या सादरीकरणाने उपस्थित रसिकांना एक वेगळीच संगीत अनुभूती(Appasaheb Jalgaonkar Centenary) दिली.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. राधिका जोशी, राकेश श्रीवास्तव, डॉ. अवंतिका सिन्हा, संतोष घंटे, डॉ. सुधांशु कुलकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात(Appasaheb Jalgaonkar Centenary) आले.

 

या मैफलीत हार्मोनियमवर सुरेश फडतरे, तबल्यावर पराग ताराबादकर तसेच निमिषा आणि अद्वैत जोशी यांनीही सहभाग(Appasaheb Jalgaonkar Centenary) नोंदवला.

f

सूर्य इलेक्ट्रॉनिक्स आणि सिटी वन यांच्या प्रायोजकत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद (Appasaheb Jalgaonkar Centenary)दिला.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00