Home गुन्हे PCMC Budget Scam Allegations::पिंपरी चिंचवड महापालिकेत अंदाजपत्रक घोटाळा? बनावट सह्यांवरून राजकीय वाद

PCMC Budget Scam Allegations::पिंपरी चिंचवड महापालिकेत अंदाजपत्रक घोटाळा? बनावट सह्यांवरून राजकीय वाद

पिंपरी चिंचवड महापालिकेत अंदाजपत्रकातील बदलांवरून मोठा वाद उफाळला आहे. उपसूचनांवर बनावट सह्या, भाजप नगरसेवकांचा सहभाग आणि ठेकेदारांना फायदा केल्याचा आरोप होत असून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तरतुदींमध्ये बदल करून मोठ्या प्रमाणात बिले काढण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या प्रकरणामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले (PCMC Budget Scam Allegations) आहे.

 

शिवसेना उपनेत्या तथा नगरसेविका सुलभा उबाळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक संदीप वाघेरे, निलेश बारणे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन हा आरोप मांडला. यावेळी नगरसेविका ऐश्वर्या तरस व रेश्मा कातळे उपस्थित (PCMC Budget Scam Allegations)होत्या.

 

सुलभा उबाळे यांनी सांगितले की, ३० व ३१ मार्च २०२६ रोजी करण्यात आलेल्या उपसूचनांच्या आधारे अंदाजपत्रकातील तरतुदींमध्ये बदल करण्यात आले. या बदलांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बिले काढण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या उपसूचनांवर भाजपच्या नगरसेवकांच्या सह्या असल्याचे समोर आले असून, त्यामुळे या प्रकरणात भाजपचा थेट सहभाग असल्याचा आरोप त्यांनी (PCMC Budget Scam Allegations)केला.

 

काही नगरसदस्यांच्या वॉर्डाशी संबंधित नसलेल्या विषयांवरही त्यांच्या सह्या आढळल्याने या सह्या दबावाखाली घेतल्या का, किंवा यामागे अन्य काही कारण आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. काही नगरसदस्यांनी तर आपल्या सह्या नसल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे बनावट सह्या करण्यात आल्या आहेत का, याची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी उबाळे यांनी (PCMC Budget Scam Allegations)केली.

 

दरम्यान, राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आरोप केला की, एका भाजप आमदाराच्या निकटवर्तीय ठेकेदाराचे हित साधण्यासाठी हा संपूर्ण गैरप्रकार करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांकडून करण्यात यावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी (PCMC Budget Scam Allegations)केली.

 

महापालिका प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या आरोपांमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, येत्या काही दिवसांत हे प्रकरण अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात (PCMC Budget Scam Allegations)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00