Home प्रेरणा / यशकथा Ekata Foundations Beed :एकता फाउंडेशन युवक आघाडीच्या राज्याध्यक्षपदी पत्रकार अन्सार शेख यांची नियुक्ती,(कवी तुकाराम धांडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान)

Ekata Foundations Beed :एकता फाउंडेशन युवक आघाडीच्या राज्याध्यक्षपदी पत्रकार अन्सार शेख यांची नियुक्ती,(कवी तुकाराम धांडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान)

शिरूर कासार येथे पार पडलेल्या एकता मराठी साहित्य संमेलनात पत्रकार अन्सार शेख यांची एकता फाउंडेशन युवक आघाडीच्या राज्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

by Admin
Spread the love

शिरूर कासार (वार्ताहर) : शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक तसेच पर्यावरण क्षेत्रात राज्यभर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकता फाउंडेशनच्या युवक आघाडीच्या राज्याध्यक्षपदी पत्रकार अन्सार शेख यांची नियुक्ती करण्यात आली (Ekata Foundations Beed)  आहे.

 

एकता फाउंडेशन ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून गुणवंतांसह वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी भरीव काम करत असून, सर्वसमावेशकतेचा आदर्श जपणारी संस्था म्हणून राज्यभर ओळखली जाते. जाती, धर्म, पंथ, लिंग किंवा भाषेच्या भेदभावाला येथे कोणताही वाव नसून सर्वांना समान संधी देण्याची भूमिका संस्था सातत्याने निभावत (Ekata Foundations Beed) आहे.

 

नुकतेच पाडळी (ता. शिरूर कासार, जि. बीड) येथे एकता फाउंडेशन, महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर कासार आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राज्यस्तरीय एकता मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. याच संमेलनादरम्यान अन्सार शेख यांना युवक आघाडीच्या राज्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात (Ekata Foundations Beed)आली.

 

अन्सार शेख हे सडेतोड, निर्भीड आणि अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित आहेत. ते दै. सरकारनामाचे संपादक असून ‘द. युवा ग्रामीण पत्रकार संघ’ाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या माध्यमातून त्यांनी राज्यातील पत्रकारांच्या विविध समस्यांवर प्रभावीपणे काम केले आहे. त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि कार्यनिष्ठेची दखल घेत एकता फाउंडेशनच्या कोअर कमिटीने त्यांची या पदासाठी निवड(Ekata Foundations Beed) केली.

 

या वेळी पाठ्यपुस्तकातील लेखक व रानकवी तुकाराम धांडे (नाशिक), संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड, सचिव पत्रकार गोकुळ पवार, कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर यांच्या हस्ते अन्सार शेख यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात(Ekata Foundations Beed) आले.

कार्यक्रमाला उपाध्यक्ष नितीन कैतके, प्रदेश प्रवक्ता मल्हारी खेडकर, राज्य महिला आघाडी प्रमुख रंजना फुंदे, लता बडे-कराड, सहसचिव लखुळ मुळे, संस्थापक सदस्य राजेश बीडकर, शिवचरित्रकार कैलास तुपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित(Ekata Foundations Beed) होते.

 

या नियुक्तीबद्दल एकता फाउंडेशनचे मार्गदर्शक, पदाधिकारी आणि विविध विभागीय तसेच जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांकडून अन्सार शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत (Ekata Foundations Beed)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00