Home प्रेरणा / यशकथा Swar Samanvay:पिंपरी-चिंचवडमध्ये पं. आप्पासाहेब जळगांवकर जन्मशताब्दीनिमित्त ‘स्वरसामन्वय’ची अनोखी संगीत मैफल

Swar Samanvay:पिंपरी-चिंचवडमध्ये पं. आप्पासाहेब जळगांवकर जन्मशताब्दीनिमित्त ‘स्वरसामन्वय’ची अनोखी संगीत मैफल

पं. आप्पासाहेब जळगांवकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्वरसामन्वय’ संगीत मैफल आयोजित. हार्मोनियम व विविध वाद्यांचा सुरेल संगम अनुभवण्याचीSwar Samanvay संधी.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : ज्येष्ठ हार्मोनियमवादक पं. आप्पासाहेब जळगांवकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संवादिनी कला मंच आणि साहित्य संगीत कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वरसामन्वय’ या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. संवादिनी कला मंचचे अध्यक्ष श्री. संतोष घंटे यांच्या संकल्पनेतून साकार होणारा हा कार्यक्रम हार्मोनियमच्या समृद्ध परंपरेचा आणि विविध वाद्यांच्या सुरेल संगमाचा आगळावेगळा अनुभव रसिकांना देणार (Swar Samanvay) आहे.

 

हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे संपन्न होणार(Swar Samanvay) आहे.

 

कार्यक्रमाची सुरुवात प्रख्यात हार्मोनियमवादक डॉ. पं. सुधांशु कुलकर्णी यांच्या विशेष सत्कार व पुरस्कार प्रदान समारंभाने होईल. त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका डॉ. राधिका जोशी यांचे शास्त्रीय गायन सादर होणार आहे. त्यांच्या गायनाला हार्मोनियमवर श्री. सुरेश फडतरे व पार्थ ताराबादकर साथ (Swar Samanvay) करतील.

यानंतर डॉ. पं. सुधांशु कुलकर्णी यांचे विशेष हार्मोनियम वादन सादर होईल. त्यांना तबल्यावर श्री. विनायक गुरव साथसंगत करणार (Swar Samanvay) आहेत.

 

कार्यक्रमाचा समारोप ‘स्वरसामन्वय’ या विशेष सादरीकरणाने होणार असून, हार्मोनियमचा प्रवास सुरांच्या माध्यमातून उलगडत नेण्यात येणार आहे. पारंपरिक ते आधुनिक अशा संगीत प्रवाहांना जोडत, विविध वाद्यांचा सुरेल संवाद रसिकांना एक वेगळीच संगीत अनुभूती देणार(Swar Samanvay) आहे.

 

या कार्यक्रमासाठी सूर्य इलेक्ट्रॉनिक्स आणि सिटी वन यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अनोख्या मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले (Swar Samanvay) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00