Home माझं पिंपरी चिंचवड Nanabai Barne :नानाबाई बारणे यांचे निधन; थेरगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Nanabai Barne :नानाबाई बारणे यांचे निधन; थेरगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

पिंपरी-चिंचवड स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या आजी नानाबाई बारणे (वय ८७) यांचे निधन; थेरगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार.

by Admin
Spread the love

थेरगाव (दि. १९ मार्च २०२६) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अभिषेक गोविंद बारणे यांच्या आजी, श्रीमती नानाबाई गोपाळ बारणे (वय ८७) यांचे गुरुवार, दिनांक १९ मार्च २०२६ रोजी दुःखद निधन (Nanabai Barne) झाले.

 

स्व. नानाबाई बारणे या अत्यंत सुस्वभावी, प्रेमळ आणि कुटुंबवत्सल होत्या. त्यांच्या जाण्याने बारणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार (Nanabai Barne)आहे.

 

त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बारणे परिवाराला भेट देत श्रद्धांजली अर्पण केली व दुःखात सहभागी होत सांत्वन (Nanabai Barne) केले.

 

स्व. श्रीमती नानाबाई बारणे यांच्या पार्थिवावर गुरुवार, दिनांक १९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता थेरगाव स्मशानभूमी, थेरगाव गावठाण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात (Nanabai Barne) आले.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00