पिंपरी : ‘निसर्गाचा खजिना’ हा बालकुमारांच्या मनाला भावणारा आणि त्यांच्या भावविश्वाला समृद्ध करणारा कथासंग्रह आहे, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी व्यक्त केले. नवी पेठ, पुणे येथील एस. एम. जोशी सभागृहात १७ मार्च २०२६ रोजी ज्येष्ठ बालसाहित्यिका रश्मी गुजराथी लिखित ‘निसर्गाचा खजिना’ या कथासंग्रहाचे प्रकाशन सोहळा पार (Nisargacha Khajina Book) पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. नीलिमा गुंडी होत्या. यावेळी डॉ. दिलीप गरुड, बाळकृष्ण बाचल, शिवाजी चाळक, प्रकाशिका प्रा. रूपाली अवचरे आणि निखिल लंभाते यांची प्रमुख उपस्थिती (Nisargacha Khajina Book) होती.
आस्मानी गुजराथी यांच्या गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘निसर्गाचा खजिना’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात(Nisargacha Khajina Book) आले.
यावेळी बाळकृष्ण बाचल यांनी या कथासंग्रहात ज्ञान आणि मनोरंजनाचा सुंदर संगम असल्याचे सांगत, भविष्यात चांगले बालसाहित्यिक घडण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. डॉ. दिलीप गरुड यांनी ‘सूर्यफूल’ या कथेचे अभिवाचन करून उपस्थितांची दाद मिळवली. प्रा. रूपाली अवचरे यांनी रश्मी गुजराथी यांच्या लेखनातील सामाजिक जाणिवांचा विशेष उल्लेख (Nisargacha Khajina Book) केला.
रोहित गुजराथी आणि रुचिता जोशी यांनी आपल्या मनोगतातून लेखिका आणि आई या दोन्ही नात्यांतील भावनिक पैलू उलगडले. स्नेही परिवाराच्या वतीने संगीता ववले यांनी भावना व्यक्त(Nisargacha Khajina Book) केल्या.
लेखिका रश्मी गुजराथी यांनी आपल्या मनोगतातून निसर्गाशी जुळलेले नाते आणि त्याचे संवर्धन बालपणापासूनच रुजावे, यासाठी हा कथासंग्रह उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात डॉ. नीलिमा गुंडी यांनी पुस्तकाचे मुखपृष्ठ, चित्रे आणि आशय बालमनातील कुतूहल जागृत करणारा असल्याचे नमूद(Nisargacha Khajina Book) केले.
कार्यक्रमाचे संयोजन रवींद्र गुजराथी आणि अर्णव जोशी यांनी केले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले, तर गायत्री गुजराथी यांनी आभार प्रदर्शन (Nisargacha Khajina Book) केले.
