पिंपरी (दि. १६ मार्च २०२६) – ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार असून मुलांना बालपणापासूनच पुस्तकांच्या सहवासात वाढवले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी केले. आर्य समाज पुस्तकालय व मोफत वाचनालय, पिंपरी कॉलनी येथे रविवारी (दि. १५ मार्च २०२६) आयोजित ग्रंथोत्सव २०२५ च्या समारोप कार्यक्रमात ते अध्यक्षीय भाषण करत (Pimpri Library) होते.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा दोन दिवसीय ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला (pimpri Library)होता.
या कार्यक्रमास आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. वर्षा तोडमल, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ पुणेचे प्रमुख कार्यवाह सोपान पवार, पुणे विभाग ग्रंथालय संघाचे कार्यवाह राजेंद्र ढमाले, कोषाध्यक्ष रमेश सुतार, आर्य समाजचे सचिव दिनेश यादव तसेच पुणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय पुणे जिल्ह्यातील विविध ग्रंथालयांचे ग्रंथपाल व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित (pimpri Library)होते.
यावेळी बोलताना बाबा भांड म्हणाले की, प्र. के. अत्रे यांच्या ‘मी कसा झालो?’ या पुस्तकाने शालेय वयातच मला लेखनाची प्रेरणा दिली. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी ग्रंथचळवळीला मोठे प्रोत्साहन दिले आणि त्यातून प्रेरणा घेऊन मी प्रकाशन क्षेत्रात पाऊल (pimpri Library)टाकले.
प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी वाचनालयाला आत्मा सुंदर करणारे पार्लर असे संबोधत आजच्या गुगल पिढीला साहित्याचे अधिष्ठान मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले. रमेश सुतार यांनी अक्षरांचे कण वेचत मानवी जीवन समृद्ध करावे, असे विचार मांडले. सोपान पवार यांनी ग्रंथोत्सव २०२५ निमित्त पंचवीस वर्षांहून अधिक सेवा देणाऱ्या ग्रंथपालांचा सन्मान करण्यात आल्याचे कौतुक (pimpri Library)केले.
आर्य समाज पुस्तकालयाची माहिती दिनेश यादव यांनी दिली. कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक ग्रंथपाल आणि वाचकांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात(pimpri Library) आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीकांत सांगेपाग, प्रमोद ढगे, सुदाम तारख, शरयू कर्डिले आणि संगीता पठारे यांनी परिश्रम घेतले. पूजा दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रेया गोखले यांनी आभार प्रदर्शन(pimpri Library) केले.
